प्रेमाचं भांडण अन्‌ पोलिसांची पळापळ

पिंपरी – प्रेयसीच्या विरोधाला न जुमानता प्रियकराने बळाचा वापर करीत तिला मोटारीत बसवून नेले. मात्र ही घटना पाहणाऱ्या एका दक्ष नागरिकाला त्या तरुणीचे अपहरण झाल्याचे वाटले. त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला मोटारीच्या क्रमांकासह माहिती दिली. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नाकाबंदी लावली. पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतल्यावर प्रेम प्रकरणाचा उलगडा झाला तोपर्यंत पोलिसांची चांगलीच पळापळ झाली.

चिंचवडला राहणारी ती हिंजवडीतील एका आयटी कंपनीत कामाला होती. तर तो शेअर मार्केटचे काम करतो. गुरुवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास ती तरुणी कामावर जाण्यासाठी निघाली. रस्त्यामध्ये तिला तिचा प्रियकर भेटला. त्याने तिला कंपनीत सोडतो, असे सांगितले. मात्र ती त्यास तयार नव्हती. अखेर त्याने बळाचा वापर करीत तिला मोटारीत बसविले. त्यांची ही झटापट एका नागरिकाने पाहिली. त्या तरुणीचे अपहरण झाल्याचा समज झाल्याने त्या नागरिकाने पोलीस नियंत्रण कक्षास याबाबत माहिती दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तरुणीच्या अपहरणाची माहिती मिळताच पोलीस नियंत्रण कक्षाने खंडणी विरोधी पथक आणि शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा आदेश दिला. ज्या मोटारीतून अपहरण झाले तिचा क्रमांक देऊन ठिकठिकाणी नाकाबंदी करण्याच्या सूचना दिल्या. अखेर पोलिसांच्या सामूहिक प्रयत्नांना यश आले. संशयित मोटार वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळून आली. मात्र मोटारीत अपहरण झालेली तरुणी नव्हती. पोलिसांनी मोटार चालकाला ताब्यात घेत खाक्‍या दाखविला आणि त्या तरुणीबाबत विचारणा केली. त्या तरुणाने तरुणीला हिंजवडी येथील कंपनीत कामावर सोडल्याचे सांगितले. पोलिसांनी कंपनीत जाऊन खात्री केली. त्यानंतर त्या दोघांनाही पोलीस ठाण्यात आणून जबाब घेतला. अपहरणाचा प्रकार नसल्याचे समजताच पोलिसांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)