प्रेमसंबंधातून कराडात मित्रावर चाकूने वार

कराड, दि. 12 (प्रतिनिधी) –माझ्या गर्लफ्रेंडचा नाद सोडायला सांगूनसुध्दा ऐकत नाहीस, तुला आता जिवंतच ठेवत नाहीफ, असे म्हणत चाकूने वार केल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. 11) रात्री बाराच्या सुमारास येथील प्रभात टॉकीजवळ घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून संशयीतावर गुन्हा दाखल झाला आहे. हर्षल गोपाल भुरके(रा. शुक्रवार पेठ, कराड), असे जखमीचे आणि श्रीकांत तपासे उर्फ चिक्या (रा. नगरपालिकेजवळ, कराड), गुन्हा नोंद झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, श्रीकांत तपासे उर्फ चिक्या याचे एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. परंतु, संबंधित मुलीने चिक्याबरोबरचे प्रेमसंबंध तोडले होते. नंतर तिचे हर्षल भुरके याच्याशी प्रेमसंबंध जुळले. यावरून हर्षल व चिक्या यांच्यात वैमनस्य निर्माण झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)