प्रेमभंगातून विद्यार्थ्याची आत्महत्या

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.30 – प्रेमाभंगामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हडपसर येथील अमनोरा पार्क परिसरात घडली. आत्महत्येपूर्वी त्याने पंधरा पानांचे पत्र लिहिले आहे. यामध्ये त्याने आई, वडील व भावाला उद्देशून माफी मागितलेली आहे.
अक्षय अखिलेश्‍वर कुमार (वय 22, रा. टॉवर न.25 अमनोरा पार्क, मूळ राहणार विशाखापट्टणम आंध्रप्रदेश) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मगरपट्टा येथील आयबीएस कॉलेजमधील व्यवस्थापन शास्त्राच्या अभ्यासक्रमाला शिकत होता. त्याने आपल्या राहत्या घरी नायलॉन दोरीच्या सहाय्याने फॅनला लटकून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने तब्बल पंधरा पानांचे पत्र लिहून त्याच्या खोलीमधील फ्रिजवर ठेवले होते. हे पत्र पोलिसांच्या हाती लागले आहे.
अक्षय कुमारचे मागील आठ महिन्यापासून एका मुलीवर प्रेम होते. मात्र तीन महिन्यांपासून मुलगी त्याला भेटण्यास नकार देत होती. यामुळे तो मागील महिनाभर महाविद्यालयातही गेला नाही. गुरुवारी दिवसभर त्याच्या काही मित्रांनी फोन केले होते. त्याने फोन न घेतल्यामुळे त्याचे मित्र त्याच्या रूममध्ये त्याला पाहण्यासाठी गेले. तेव्हा त्याने दरवाजा उघडला नाही. खिडकीतून डोकावून पाहिले असता त्याने आत्महत्या केल्याचे दिसून आले. अक्षयने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पंधरा पानांच्या पत्रामध्ये प्रेमाची सुरूवात ते शेवट इथपर्यंत सर्व नमूद केलेले आहे. आत्महत्या करीत असल्याबद्दल आपल्या आई, वडील व भावाला उद्देशून माफी मागितलेली आहे. तसेच मित्रांना उद्देशूनही माफी मागितलेली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक माणिक डोके करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)