‘प्रेझेन्ट’ नव्हे तर ‘जय हिंद’ म्हणा : गुजरात शिक्षण विभागाचे आदेश 

अहमदाबाद – सध्या देशात देशभक्तीचे वारे जोरदार वाहत आहे. लहानपणापासूनच देशभक्तीची भावना मनात रुजावी यासाठी अनेक मार्गांचा अवलंब करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर गुजरातमधील शाळेत आता विद्यार्थ्यांनी हजेरीच्या वेळेस येस सर किंवा येस मॅडम म्हणण्याऐवजी जय हिंद किंवा जय भारत बोलण्याची सक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालय आणि गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (GSHSEB) अधिसूचना जारी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या अधिसूचनेनुसार, इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीतील विद्यार्थ्यांना ‘जय हिंद’ अथवा ‘जय भारत’ बोलून हजेरी लावावी लागणार आहे. सरकारी शाळा, अनुदानित तसंच विनाअनुदानित शाळांना या अधिसूचनेचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. १ जानेवारी २०१९ पासून या अधिसूचनेच पालन करण्याचेही आदेश देण्यात आले आहे. राज्य शिक्षण मंत्री भूपेंद्र सिंह चुदासमा यांनी हा निर्णय घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)