प्रेग्नन्सीबाबतच्या अफवांना एलियानाचे उत्तर

एलियाना डिक्रूजला जेंव्हा तिच्या लग्नाबाबत विचारले जाते, तेंव्हा याविषयावर तिला बोलायलाही आवडत नाही. असे असतानाही गेल्या काही दिवसात ती प्रेग्नन्ट असल्याचे बोलले जायला लागके, त्यामुळे नाईलाजाने का होईना पण एलियानाला या विषयावर प्रतिक्रिया देणे भाग पडले. तिने सोशल मिडीयावरून याबाबतचे स्पष्टिकरण दिले आहे. इन्स्टाग्रामवर तिने स्पष्ट केले आहे की ती प्रेग्नंट नाही. ही अफवा पसरण्यामागे एक कारण आहे.

एलियानाचा पूर्वीचा बॉयफ्रेंड आणि माजी पती ऍन्ड्रू नीबोन याने सोशल मिडीयावर एक पोस्ट टाकली होती. त्याने एलियानाचा एक फोटो शेअर केला होता. एलियाना बाथटबमध्ये असताना हा फोटो काढलेला होता. त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये “हॅविंग सम स्वीट टाईम अलोन काईंड ऑफ…’ असे नीबोनने म्हटले होते. त्याच्या या फोटो कॅप्शनमुळे एलियाना प्रेग्नंट आहे की काय, असा अंदाज वर्तवला जाऊ लागला होता.

मात्र एलियानाला जेंव्हा या अफवांबद्दल समजले तेंव्हा तिने झटक्‍यात सोशल मिडीयावरून स्पष्टिकरण देऊन टाकले. आपल्या दोन फोटोंबरोबर तिने चांगले तेच स्वीकारावे… अशा अर्थाची इरसाल शिवीच हासडली आहे. एलियानाला आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोललेले आवडत नाही हे तिने पुन्हा दाखवून दिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)