प्रेक्षकांना ठगवण्याचा प्रयत्न

दिवाळी म्हटलं की बॉलीवूडचे मोठे चित्रपट प्रदर्शित होतात, नेहमी शाहरुख खान आपल्या चाहत्यांना दिवाळी गिफ्ट घेउन येतो यंदा त्यात थोडा बदल आहे, बिग बी अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला अमीर खान पाहिल्यांदाच एकत्र आले आल्याने ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’ ची उत्सुकता वाढली होती. मात्र सुमार कथानकामुळे इथे प्रेक्षकांनाच ठगवण्याचा दर्जाहीन प्रयत्न करण्यात आला आहे

‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’ ही १७९५ सालची गोष्ट आहे. इंग्रजांनी नुकतेच भारतावर राज्य करायला सुरुवात केली होती. भारतीय राजे-राजवाडे खालसा करण्यासाठी, त्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी तैनाती फौजेची सुरुवात झाली होती. रौनकपूर एक असे राज्य होते, जे अद्यापही इंग्रजांना हुलकावणी देत होते. मग संस्थानाचं रक्षण करण्यासाठी म्हणून आपले इंग्रज सैन्य संस्थानात घुसवून नंतर ते काबीज करायचे हा डाव इथेही खेळला जातो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खुदाबख्श जहाजी उर्फ आझाद (अमिताभ बच्चन) या राज्याचा सेनापती असतो. रौनकपूरचा ‘मिर्जा साहब’ (रोनित रॉय) याच्यासकट संपूर्ण राज्याच्या रक्षणाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असते.अचानक ईस्ट इंडिया कंपनीचा जनरल जॉन क्लाईव्ह या राज्यावर धोक्याने कब्जा मिळवतो आणि ‘मिर्जा साहब’ला मारतो. खुदाबख्श ‘मिर्जा साहब’ची मुलगी जफीरा (फातिमा सना शेख) हिला इंग्रजांच्या तावडीतून कसेबसे वाचवतो आणि ११ वर्षे लपूनछपून आपल्या लोकांना गोळा करून इंग्रजांविरोधात गनिमी युद्ध छेडतो. त्याच्या लढ्याला बळ पुरवणारे अनेक राजे आहेत. इंग्रज त्याला जेरबंद करण्यासाठी फिरंगी मल्ला (अमीर खान) नामक एका ठगाला आझादच्या कंपूत पाठवतात. त्यानंतर पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी चित्रपट बघायला हवा.

दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य यांनी यापूर्वी धूम ३ चे दिग्दर्शन केले आहे, तर धूम सिरीज, गुरु अशा चित्रपटासाठी लेखक, संवाद लेखक म्हणून काम केलेले आहे. यशराज फिल्म्सची निर्मिती, अमीर, अमिताभ असी आजपर्यंत न एकत्र आलेली जोडी याला भव्यतेची फोडणी दिली की आपण काहीही दाखवायला मोकळे असां विचार त्याने हा चित्रपट बनवला की काय? असा प्रश्न अवघ्या कांही मिनिटात प्रेक्षकाला पडतो. कारण, चित्रपटाला आवश्यक असणारी कथा कुठेच दिसत नाही. जी काही आहे, त्या कथेला आपण वेगवेगळ्या चित्रपटामधून यापूर्वी पाहिलेलं आहे. कथेचा काळ उभारण्यात जी भव्यता आणली, त्यासाठी जी मेहनत घेतली ती मेहनत कथेच्या पूरक बाबीशी संबधित संशोधन करताना वापरली गेली नाही, ज्या चहाचा शोध १८२० नंतरचा आहे, त्याचा उल्लेख २५ वर्ष जुन्या कथेत देण्यात आला आहे, अशा अनेक खटकणारी उदाहरणे इथे देता येतील, पटकथा आणि संवाद सुद्धा सुमार आहेत, काही अश्लील संवाद तर रिपीट आहेत.

कलाकारांच्या अभिनया बद्दल बोलायचे तर अमीर खानाने साकारलेला फिरंगी मल्लाहचे पात्र ना विनोदी आहे ना सिरिअस, तीच गत अमिताभ यांच्या आझादची आहे. फातिमा सना शेख हिच्या वाट्याला आलेली भूमिका वगळता कोणत्याच पात्रामध्ये एकसंघपणा दिसत नाही. कतरीना कैफ फक्त दोन गाण्यासाठी आहे.

संगीतकार जोडी अजय-अतुल यांची चित्रपटात ठेका धरायला लावतात मात्र लक्षात राहत नाहीत. चित्रपटतील व्हिएफएक्स इफेक्टसची जोरदार चर्चा होती. पण प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यानंतर यादृष्टीने चित्रपटात काहीही दम नसल्याचे दिसते. आमिताभ बच्चन आणि आमीर खान या दोघांनी हा चित्रपट स्वीकारला असे अस प्रश्न आपल्याला सतत पडतो. तुमच्याकडे वेळ घालवण्यासाठी इतर पर्यायच नसेल तर ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’ बघू शकता.

चित्रपट – ठग्ज ऑफ हिंदुस्तान
निर्मिती – यशराज फिल्मस्
दिग्दर्शक – विजय कृष्णा आचार्य
संगीत – अजय अतुल
कलाकार – अमिताभ बच्चन, अमीर खान, फातिमा सना शेख, कतरिना कैफ.
रेटिंग – *

– भूपाल पंडित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)