प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा ‘मामि’

अमोल ज्ञानेश्वर कचरे

20 वा ‘मामि’ (मुंबई academy of moving Images) चित्रपट महोत्सव 25 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान मुंबईत पार पडला. ‘मामि’चे हे 20 वं वर्ष असल्याने दर वर्षी पेक्षा थोड्या हटके फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. दरवर्षी पेक्षा यावर्षी डेलिगेट फी कमी केल्यामुळे मुंबईतील चित्रपट प्रेमी तरुणाईने या महोत्सवाला जोरदार प्रतिसाद दिला. या चित्रपट महोत्सवातील प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या काही चित्रपटांविषयी थोडंसं…

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शॉपलिफ्टर्स –

शॉपलिफ्टर्स ही जपान मधील फिल्म या महोत्सवात पाहायला मिळाली. या चित्रपटाच्या अगदी पहिल्या प्रसंगामध्येच चित्रपटाची थीम क्लीअर केलीये. एक बाप-लेकाची जोडी छोट्या मॉल मधून खूपच शिताफीने सामान चोरत असतात. त्यांच्या कुटुंबात एक म्हातारी आजी, तिची एक मानलेली मुलगी, नात, तिच्या हयात नसलेल्या मुलीचा नवरा आणि एक शाळकरी वयातील मुलगा असे मेंबर असतात.

वरकरणी हे कुटुंब रक्तातील नात्याचं वाटत असलं, तरी तसं ते नसतं हे आपल्याला पुढं जाऊन समजतं. मुख्य म्हणजे दिग्दर्शक प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथे मध्ये गुंतवून ठेवण्यात यशस्वी झालाय. आणि जपान मधील चित्रपटांचं वैशिष्ट्य म्हणजे ते प्रचंड भावून चित्रपट तिथे तयार केले जातात. नैसर्गिक अनुभव, वास्तवदर्शी लोकेशन्स या आणखीन जमेच्या बाजू.

मामी या महोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी शॉपलिफ्टर्स हा अप्रतिम सिनेमा पाहायला मिळाला. त्यामुळे अशाच सिनेमविषयीची उत्सुकता वाढली. छोट्या मॉल पासून मोठया मॉल मध्ये खूप शिताफीने सामान चोरणार्या कुटुंबाची कथा या सिनेमात दाखवली गेलीये. वरकरणी हे कुटुंबातील सदस्य सरळ, साधे वाटत असले तरी जसा जसा चित्रपट पुढे जातो, तसं तसं या सदस्यांची दुसरी बाजू आपल्याला दिसायला लागते. म्हातारी तिच्या कडे राहणाऱ्या नाती समान मुलीला चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडते. शिवाय त्या मुलीच्या आई-वडिलांकडून दर काही दिवसांनी ती म्हातारी पैसे उकळत असते, हे त्या मुलीला माहिती नसतं. या कुटुंबाने एक खून केलेला असतो, पुढं जाऊन त्याबद्दल कशा प्रकारे वाचा फुटते हे चित्रपटात पाहायला मजा येते.

प्रतिष्ठेच्या अशा कान चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे. हिरोकझु कोरे-इडा या जपान मधील नावाजलेल्या दिग्दर्शकाने हा चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय.

पिटी (ग्रीस) –

कोमा मध्ये असलेल्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये दररोज भेटायला जाणारा, पेशाने वकील असणाऱ्या एका विक्षिप्त माणसाची कथा पिटी या चित्रपटात दाखवली आहे. हा असा माणूस आहे जो जेव्हा दुःखी असतो, तेव्हा जास्त आनंदी असतो. सतत दुःखाचं अटायर घेऊन वावरणाऱ्या या व्यक्तीच्या आयुष्यात ज्या घटना घडतात त्या पाहायला मजा येते.

त्याची पत्नी जेव्हा कोमा मध्ये असते, तेव्हा तो सगळ्यांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा त्याची बायको कोमा मधून बाहेर येते, तेव्हा सुध्दा तो लोकांना खोटं सांगतो, की माझी पत्नी अजून कोमातच आहे. यात कोणता असुरी आनंद त्याला मिळत असतो, कोण जाणे. त्याच्या शेजारी राहणारी एक लग्न झालेली महिला , त्याची पत्नी हॉस्पिटलमध्ये असताना अधून मधून जेवण देत असते. तर नंतर त्याची बायको घरी आल्यावर सुद्धा तो निर्लज्ज पणे त्या महिलेकडूनच जेवण मागतो. या विक्षिप्त माणसाच्या आयुष्यात पुढे आणखीन काय काय होतं ते चित्रपटातच पाहायला मजा येते. खरं तर चित्रपटाच्या पोस्टर वरूनच चित्रपटा विषयीची आपली उत्सुकता वाढते.अशा प्रकारचे संथ सिनेमे पाहताना ते खूप संयमाने पाहावे लागतात. अशा प्रकारचे सिनेमे हे परफेक्ट फिल्म फेस्टिवल पॅकेज असतात.

सोनी-

एका खूप महत्वाच्या विषयावर भाष्य करणारा चित्रपट यंदाच्या मामी चित्रपट महोत्सवात पाहायला मिळाला. इव्हान आयर दिग्दर्शित सोनी हा चित्रपट. दिल्ली मधील महिला सुरक्षे भोवती या चित्रपटाची कथा फिरते. सोनी एक तरुण पोलीस अधिकारी आणि तिच्या वरिष्ठ अधिकारी ज्या IPS आहेत, कल्पना या दोघींची कथा चित्रपटात दाखवली गेलीये. तरुण पोलीस अधिकारी सोनी हिला महिलांसोबत होणाऱ्या छेडछाड, अति प्रसंग या बद्दल प्रचंड चिड असते.

चित्रपटा च्या सुरुवातीलाच एक तरुण सोनीची छेड काढत असताना दाखवलं आहे. सोनी पोलीस अधिकारी असते हे त्या तरुणाला माहिती नसतं. थोडा वेळ संयम ठेवून सोनी नंतर त्या तरुणाला इतकं मारते, की त्या तरुणाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतं. महिलांविरोधात होणाऱ्या अत्याचारांबद्दल सोनीच्या डोक्यात इतकी सनक असते, की सतत ती अशा प्रकारच्या काही घटना घडल्या की तिथल्या तिथे लेडी सिंघम बनून गुन्हेगारांना धडा शिकवत असते.

पण मानव अधिकार या गोंडस नावाखाली सिस्टीम मधील पुरुषी अहंकार असणारे अधिकारी यांना हे पाहवत नाही. ते सोनी ला या ना त्या प्रकारे त्रास देण्यास बघतात. यात सोनीच्या वरिष्ठ अधिकारी कल्पना या सोनीची साथ देतात. थोड्या भावून असणाऱ्या कल्पना सोनीच्या या लेडी सिंघम अवताराच्या सुद्धा विरोधात असतात. पण सोनी असं का करते हे कल्पना यांनी जाणून घेतल्या नंतर त्या सोनीच्या पाठीशी उभ्या राहतात. चित्रपटाच्या शेवटी शांत संयमी IPS अधिकारी कल्पना या जेव्हा सिस्टीमच्या विरोधात जाऊन सत्याच्या बाजूने उभ्या राहतात तेव्ह त्यांच्यात झालेला हा बदल प्रेक्षक म्हणून आपल्यालालही आवडून जातो.

दिल्ली मध्ये महिला सुरक्षा हा विषय किती गंभीर आहे हे आपण जाणतोच. अशा विषयावर  वात्सवदर्शी सिनेमा बनवण्याचं शिवधनुष्य इव्हान आयर या नवख्या दिग्दर्शकाने छान पेललं आहे.

गीतिका विद्या ओहला या अभिनेत्री ने सोनी या गरम डोक्याच्या तरुण पोलीस अधिकाऱ्याची भूमिका उत्तम केली आहे. सोबत सलोनी बत्रा या अभिनेत्रीने सुद्धा कल्पना या IPS अधिकाऱ्याची भूमिकेत चांगलं काम केलं आहे. चित्रपट संपल्यावर या दोन्ही अभिनेत्रींचा अभिनय आपल्या लक्षात राहतो , विचार करायला लावतो,  हीच त्यांच्या नैसर्गिक अभिनयाची पावती आहे. यंदाच्या मामी मधील एक उत्तम, दर्जेदार चित्रपट पाहण्याचा फील सोनी हा चित्रपट पाहून आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)