प्री लॉन्च ऑफर फायद्याची, पण… (भाग-२)

गृहनिर्माण प्रकल्प तयार झाल्यानंतर त्यातील फ्लॅटच्या किमती वाढतात. त्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू करण्यापूर्वी “प्री-लॉंच बुकिंग ऑफर’ देऊन ग्राहकांना आकृष्ट करण्याचा शिरस्ता सध्या वाढत आहे. यामुळे प्रकल्पाच्या प्रारंभावेळी जी किंमत असेल, त्या किमतीत घर मिळू शकते. त्यामुळे ग्राहकाचा फायदा होत असला, तरी त्यात जोखीमसुद्धा असते.

प्री लॉन्च ऑफर फायद्याची, पण… (भाग-१)

बांधकाम सुरू करण्यासाठीच्या सर्व परवानग्या विकसकाने घेतल्या आहेत का, याची खातरजमा सर्वांत आधी करायला हवी. सॅम्पल फ्लॅट तयार झाल्यानंतरच प्री-लॉंच बुकिंग करावे, असाही सल्ला काही तज्ज्ञ देतात. प्रकल्पाचा आराखडा संबंधित प्राधिकरणाकडून मंजूर करवून घेण्यात आला आहे का, हेही पाहावे लागेल. आर्किटेक्‍ट आणि विकसकाची पार्श्‍वभूमी चांगली असल्याचीही खात्री करून घ्यावी लागेल. वीज, पाणी अशा गरजेच्या बाबींची पूर्तता केली जाईल, याचीही खात्री असायला हवी.

कोणत्याही विकसकाकडून विकसित होत असलेल्या एखाद्या प्रकल्पात गुंतवणूक करायची असेल तर काही गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे. फसवणुकीचा धोका नाही ना, याची खात्री केल्यानंतरच प्री-लॉंच बुकिंगची ऑफर स्वीकारावी. काही वेळा फसवणुकीची शक्‍यता वरवर दिसत नाही; परंतु नंतर तशी शक्‍यता दिसू लागते. त्यामुळे काळजी घेणे आवश्‍यकच आहे. जेव्हा आपला पैसा आपण एखाद्या विकसकाच्या योजनेत गुंतवतो, तेव्हा प्रकल्पाचा ले-आउट प्लॅन प्रथम पाहावा. संबंधित प्राधिकरणाकडून तो संमत करवून घेतला आहे का, हे पाहावे. ज्या प्रकल्पात आपण गुंतवणूक करीत आहोत, ती ज्या जमिनीवर उभी राहणार आहे, त्यावर विकसकाची मालकी खरोखर आहे का, हेही तपासायला हवे. मालमत्ता भाडेपट्ट्याने दिली जाणार आहे की फ्री-होल्डिंग आहे, हे तपासावे. त्यानंतर संबंधित फ्लॅट आपल्या ताब्यात आल्यावर कोणत्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत, याचीही माहिती घ्यावी. मेन्टेनन्सची सुविधा विकसकाकडून दिली जाणार आहे का, हा प्रश्‍न महत्त्वाचा ठरतो. त्याचप्रमाणे पार्किंग, पॅसेज-वे आदी सार्वजनिक जागांचा वापर आपण किती प्रमाणात आणि कसा करू शकू, हेही पाहायला हवे. त्याचप्रमाणे ठराविक कालावधीनंतर फ्लॅटचा ताबा देण्यास विलंब झाला, तर संबंधित विकसक ग्राहकाला नुकसान भरपाई देणार आहे का? देणार असल्यास किती आणि कोणत्या प्रकारे देणार, हेही समजून घ्यावे आणि मगच प्री-लॉंच बुकिंग ऑफर स्वीकारावी.

– कमलेश गिरी 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)