प्रीतम मुंडेवर टिप्पणी करणाऱ्या शिक्षकाला मारहाण

पिंपरी – निगडीतील एका शिक्षकाने बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर आक्षेपर्ह टिप्पणी केली. या शिक्षकाला फेसबुक लाईव्ह करुन माफी मागालला लावून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात रविवारी (दि. 9) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय कुऱ्हाडे असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. कुऱ्हाडेंसह पाच ते सहा जणांविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलांविषयी बेताल वक्तव्य करणारे भाजपचे आमदार राम कदमांच्या वक्तव्यावरून संजय कुऱ्हाडे यांनी प्रीतम मुंडे या देखील अविवाहित असल्याची टिप्पणी सोशल मीडियावर केली होती. याच रागातून गणेश कराड आणि त्याच्या साथीदारांनी फेसबुक लाईव्ह करून मारहाण आणि शिवीगाळ केली.

संजय कुऱ्हाडे यांनी राम कदमांच्या वक्तव्याबाबतच्या एका पोस्टवर ही कमेंट केली होती. त्यानंतर वाद निर्माण झाला. संजय कुऱ्हाडे हे कॅम्प एज्युकेशनमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आज दुपारी गणेश आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कुऱ्हाडेंना निगडी येथील निवेदिता बॅंकेसमोर बोलावून घेतले. फेसबुक लाईव्ह सुरू केले. आधी पोस्ट केलेल्या वक्तव्याची माफी मागायला लावली आणि मग शिवीगाळ करत मारहाणही केली. याप्रकरणी निगडी पोलिसांनी मारहाण आणि अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गणेश कराड आणि त्याचे सहकारी हे मुंडे समर्थक असल्याची माहिती समोर येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)