प्रिया वारियर झाली बेरोजगार

यावर्षी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी डोळा मारणाऱ्या प्रिया वारियरच्या व्हिडीओने सर्व देशभर खळबळ उडवून दिली होती. त्या व्हिडीओचे अनेक तरुणींनी नंतर अनुकरण करून स्वतःचे व्हिडीओही व्हायरल केले होते. मात्र सध्या आपण बेरोजगार असल्याचे तिने इन्स्टाग्रामवर म्हटले आहे. तिने म्हटले आहे. तिची ही पोस्ट अतिशय गंभीरतेने घेतली तर ती बेरोजगार आहे, असाच अर्थ निघतो. तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये तिच्याबरोबर एक तरुणही दिसतो आहे. कॅप्शनमध्ये तिने म्हटले आहे की “तुम्ही जर बेरोजगार असाल, तरीही कोणी तुमच्याबरोबर फोटो काढायला उत्सुक असू शकतो.’

गेल्या महिन्यातच प्रियाला तिच्या करिअरमधील पहिला ऍवॉर्ड मिळाला. 19 वर्षाच्या प्रियाला “व्हायरल पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ ऍवॉर्डने सन्मानित करण्यात आले. मल्याळम सिनेमा “ओरु अदार लव’मध्ये “माणिक्‍य मलराय पूवी’ या गाण्यात तिने डोळा मारण्याचा सीन दिला होता. या 26 सेकंदांच्या व्हिडीओ क्‍लीपनंतर तिचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. यावरून तिला धमक्‍या आणि कोर्ट केसेसनाही सामोरे जावे लागले होते. “ओरु अदार लव’ हा सिनेमा मल्याळमच्या व्यतिरिक्‍त तमिळ, तेलगू आणि हिंदीमध्येही रिलीज करण्याचे निर्मात्यांनी ठरवले आहे. मात्र तशी अधिकृत घोषणा मात्र केली गेली नाही. इतक्‍या सगळ्या भाषांमध्ये डबिंग होण्याची शक्‍यता असलेला हा सिनेमा या वर्षी ईदच्या सुमारास रिलीज होणार आहे. तो सिनेमा जर हिंदीतही आला तर त्याची टक्कर सलमान खानच्या “रेस 3′ शी होईल. अर्थातच प्रियाच्या डब केलेल्या दक्षिणात्य सिनेमाचे सलमानच्या सिनेमाला आव्हान नसेल. पण प्रियासाठी या सिनेमानंतर पुढे काय करायचे हा प्रश्‍न मात्र निश्‍चितच आव्हानात्मक आहे. तिला बॉलिवूडमधूनही ऑफर्स येत असल्याचे समजले होते. पण त्यापैकी कोणताही सिनेमा तिने साईन केल्याचे समजलेले नाही. म्हणजेच सध्या ती शब्दशः बेरोजगार आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)