प्रिया प्रकाशची स्टाईल ‘या’ अभिनेत्रीने केली कॉपी 

इंटरनेट सेन्सेशन मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश हिच्या डोळ्याच्या अदांचे आज लाखो चाहते आहेत. ओमर लुलू यांच्या ‘ओरु अदार लव्ह’ या मल्ल्याळम सिनेमातून प्रिया पदार्पण करत आहे. याच चित्रपटातील ‘मणिक्या मलराया पूर्वी’ गाण्यातील एका छोट्याश्या क्लिपमुळे प्रिया प्रकाश रात्रीत नॅशनल क्रश बनली होती.सोशल मीडियावरही तिने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले होते. आता मात्र एका बॉलिवूड अभिनेत्रीने प्रियाची डोळ्यांची स्टाईल कॉपी आहे.

दिशा पटानी हिने प्रियाची स्टाईल कॉपी केलेला एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत दिशा पूर्णतः प्रिया प्रकाशसारखीच दिसत आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वास्तविकता हा व्हिडीओ एका कॉफीच्या ब्रँड जाहिरातीसाठी बनविण्यात आला आहे. यामध्ये दिशा वेगवेगळे मीम्स करत आहे. यावेळी प्रिया प्रकाशच्या स्टाईलमध्येही व्हिडीओ बनविण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup: Thumbs up
8 :heart: Love
2 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)