प्रिया प्रकाशचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल

अनेक तरुणांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या प्रियाचा अजून एक व्हिडिओ समोर आला आहे. तिचे व्हिडिओज इतके पटकन व्हायरल झाले की रातोरात ती प्रसिद्ध झाली. एका रात्रीत तिचे इंस्टाग्रामवर 50 लाखांहुन अधिक फॉलोव्हर्स झाले. आता तिचा अजून एक व्हिडिओ समोर आला आहे. यात तिचा सिंपल लूक पाहायला मिळतो. या व्हिडिओत प्रिया पिंक कलरच्या ड्रेसमध्ये बागेत फिरताना दिसते. तिने कोणताही मेकअप केलेल्या नसल्याने ती खूपच सिंपल लूकमध्ये दिसत आहे. प्रियाचे लाखो फॉलोव्हर्स असल्याने ती एका पोस्टसाठी 8 कोटी रुपये घेते. मात्र, याबाबत अद्याप तिने काहीही खुलासा केलेला नाही.

प्रिया मल्यालम चित्रपट “ओरू अदार लव’ यातून डेब्यू करत आहे. या चित्रपट शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित आहे. तिला अनेक बॉलिवूड चित्रपटांच्याही ऑफर्स आल्या, पण तिने कोणतीच ऑफर स्वीकारली नाही. तिच्या फॉलोव्हर्सची संख्या वाढल्याने तिच्या पोस्टमधून ती बक्कळ पैसे कमावते आहे. तिला नवनव्या ब्रॅंडच्या जाहिरातींसाठीही ऑफर्स येत आहेत. तसेच टॉलीवुडमधीलही अनेक चित्रपट निर्माते तिच्या संपर्कात आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)