प्रिया दत्त यांना कॉंग्रेसच्या सचिवपदावरून हटविले 

नवी दिल्ली/मुंबई: माजी खासदार प्रिया दत्त यांना कॉंग्रेस पक्षाने ऑल इंडिया कॉंग्रेस कमेटीच्या (एआयसीसी) सचिवपदावरून हटवले आहे. कॉंग्रेसचे महासचिव अशोक गहलोत यांनी प्रिया दत्त यांना पत्र लिहून ही माहिती दिली आहे.
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपले अथक परिश्रम आणि पक्षाच्या सचिवपदावरून आपण दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली आहे, असे गहलोत यांनी पत्रात लिहिले आहे. मात्र, पक्षाने प्रिया दत्त यांना सचिव पदावरून हटवण्यामागील कारण स्पष्ट केले नाही.
वडील सुनील दत्त यांच्या निधनानंतर प्रिया दत्त यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. प्रिया दत्त पहिल्यांदा 2005 मध्ये खासदार बनल्या होत्या. त्यानंतर 2009 मध्येही त्यांनी मुंबई नॉर्थ-सेंट्रल लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती. मात्र, 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारी पूनम महाजन यांच्याकडून प्रिया दत्त यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)