सातारा- धावपळीच्या युगात कोणीही कोणासाठी वेळ देत नाही. प्रामाणिकपणा तर दूरच राहतो. मात्र, येथील एच.पी.प्रिया एजन्सीने दाखवून दिले आहे.ऑफिसमध्ये राहिलेली पैशासह कागदपत्रे व बॅग ग्राहकास परत केल्याने कौतूकास पात्र ठरली आहे. येथीळ नागरिक अनिल वीर कामानिमित्त दिवसभर अनेक कामे केल्याने बॅग कुठे राहिली हे विसरले होते. ते जेथे जेथे गेले होते तिथे तिथे जावून चौकशी केली असता पदरी निराशाच आली.

अशाच अवस्थेत साताऱ्याहून बाहेरगावी सुमारे 50 कि. मी. अंतर त्यांनी पार पाडल्यावर प्रिया एजन्सीच्या कार्यालयातून त्यांना फोन आला. त्यांची बॅग प्रिया एजंसीत राहिल्याची त्यांना माहिती मिळताच त्यांना हायस वाटले.वीर यांनी तात्काळ त्यांचे मित्र तथा आधार सोशल ग्रुपचे अध्यक्ष अमित कोठावळे यांना फोन करून बॅग ताब्यात घेण्यास सांगीतले.

त्यात किमान 25 हजार रुपये असतील अशी ही माहिती वीर यांनी दिली. एजन्सीचे मालक हेमंत जाजू यांनी वीर यांना फोन करून सांगितले की, बॅगेत रु.20-22 हजार नाहीत तर रु.32 हजार रुपये आहेत. जाजु यांनी वीर यांची बॅग कोठावळे यांना कागदपत्रांसह माघारी दिली. जाजूंसह व्यवस्थापक मनोहर जाधव, विजय साळुंखे, संगिता पवार, रसिका सकपाळ, सविता येवले, प्रियांका अडसूळ,अंबिका, पूजा डोईफोडे, तेजल माने, राजकुमार पवार, तानाजी साळुंखे, विजय सावंत व महेश सोळसकर आदी कर्मचारीवृंदांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)