आपल्या आंखमार व्हिडीओने एका रात्रीत पूर्ण देशाला वेड लावणाऱ्या प्रिया प्रकाश वॉरीअरचा आणखी एक फोटो पुन्हा चर्चेत आला आहे. या फोटोत हि मल्याळी अभिनेत्री एका गोड मुलाबरोबर दिसते आहे. या फोटोला एका दिवसांत तब्बल 8,05,424 लाईक्‍स मिळाले असून इन्स्टाग्रामवर हा फोटो झळकला आहे. या फोटोवर क्‍युट, स्वीट अशा कॉमेंटचा अक्षरशः पाऊस पडला आहे.

प्रियाने आणखी एक फोटोही या ठिकाणी शेअर केला असून त्यात एक छोटा मुलगा तिची पप्पी घेताना दिसतो आहे. हा फोटो विजय टिव्ही कॉमेडी अवॉर्ड दरम्यानचा आहे. यात प्रिया खूपच ग्लॅमरस दिसते. या फोटोत प्रियासोबत असलेल्या बाळाबाबत तिच्या फॅन्सकडून अनेक प्रश्‍न विचारले जात आहे. प्रियाचे हा फोटो पाहून तिला लहान मुले खूपच आवडत असावीत, असा तर्क सहज करता येतो.

“ओस आदर लव’ चित्रपटातील गाण्याच्या एका क्‍लिपमुळे प्रियाला रातोरात प्रसिद्धी मिळाली होती आणि तिला नॅशनल क्रश टायटल दिले गेले होते. प्रियाचे इन्स्टाग्रामवर 54 लाख फोलोअर आहेत. आंख मार फोटोमुळे तिच्यावर न्यायालयात हजर राहण्याची वेळी आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)