युनिसेफची ब्रॅंड अँबेसिडर असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. प्रियांका बांगलादेशमधील रोहिंग्या निर्वासितांची भेट घेण्यास गेली होती. यानंतर तिने येथील लोकांची भेट घेऊन काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. मात्र यावरुन तिला ट्रोल केले जात आहे.

मी बांगलादेशमधील रोहिंग्या निर्वासितांच्या शिबिरातील दौऱ्यावर आले आहे. यासंबधी माझे अनुभव ऐकण्यासाठी मला इन्स्टाग्रामवर फॉलो करा. तसेच या लोकांची काळजी घेण्याची आवश्‍यकता असल्याचेही तिने फोटो शेअर करुन लिहिले. मात्र तिच्या या पोस्टवर अनेकांनी टीका केली आहे. चॅरीटीची सुरुवात आपल्या घरातून होते, तेव्हा प्रियांका तु रोहिंग्यांच्या किती मुलांना दत्तक घेतले आहेस? असा सवालच तिला करण्यात आला आहे. काहींनी काश्‍मिरी पंडितांना कधी भेटायला गेलीस का? असेही विचारले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)