प्रियांका-निक यांच्यात दुरावा

बॉलीवूडमधील देशी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास लग्नाच्या अवघ्या चार महिन्यातच दुरावा निर्माण झाल्याची चर्चा रंगत आहे. प्रियांका आणि निकने घाईगडबडीत लग्न केले आणि आता त्यांच्यात वाद होऊ लागले आहेत. त्यामुळे या दोघे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे वृत्त आहे.

निक जोनास आणि प्रियांका एकमेकांना जास्त वेळ देवून शकत नसल्याने त्यांच्यात प्रत्येक गोष्टीवर मतभेद होत आहेत. प्रियांका आणि निक कामापासून पार्टीपर्यंत प्रत्येक गोष्टीवरुन भांडतात. दोघांनी घाईत मोठा निर्णय घेतला आणि आता त्याचीच किंमत मोजत आहेत. त्यांचे लग्न धोक्‍यात आहे, असे एका वृत्तात म्हटले आहे.

दरम्यान, याबाबत प्रियांका चोप्राच्या टीमसोबत संपर्क करुन विचारणा केली असता त्यांनी हे वृत्त चुकीचे आणि खोटे असल्याचे सांगितले. मात्र प्रियांकाकडून अधिकृत वक्तव्य केव्हा जारी होणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
मागील वर्षी डिसेंबरमध्ये निक आणि प्रियांकाच्या शाही विवाहसोहळा पार पडला होता. जोधपूरमध्ये झालेल्या या लग्नसोहळ्यात कुटुंबातील निवडक आणि खास लोकच सहभागी झाले होते.

दुसरीकडे बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्र सध्या पती निक जोनाससोबत मियामीमध्ये सुट्टीसाठी गेली आहे. त्यांच्यासोबत जो जोनास आणि त्याची गर्लफ्रेण्ड सोफी टर्नरही आहेत. आपल्या धम्माल मस्तीचे व्हिडीओ आणि फोटो या चौघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)