प्रियांका, दिपिका नव्हे, तर ही अभिनेत्री आहे भारताबाहेर सर्वाधिक लोकप्रिय

तुम्हाला असे वाटत असेल की, दोन वर्षांपासून प्रियांका चोप्रा अमेरिकात राहत टीव्ही शो आणि हॉलीवुडमध्ये काम करत असल्याने भारताबाहेर सर्वाधिक लोकप्रिय आहे. किंवा दीपिकाने विन डिजलसारख्या मोठ्या अभिनेत्यासोबत हॉलीवुड चित्रपटात काम केल्याने ती लोकप्रिय असेल, तर ते चुकीचे आहे. आज भारताबाहेर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री नाव असेल तर ती अभिनेत्री आहे कटरिना कैफ.

भारताबाहेर ज्या बॉलीवूड अभिनेत्री अधिक लोकप्रिय आहेत त्यात कतरिना कैफचा पहिला नंबर लागला आहे. व्हिडीओ ऑन डिमांड स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म स्पूल ने केलेल्या सर्व्हेक्षणात हा निकाल आला आहे. यानुसार कतरिनाने अनुष्का शर्मा, आलीय भट, करीना कपूर आणि काजोल यांना मागे टाकले आहे. हि कंपनी भारतीय आणि परदेशात राहणारे भारतीय काय पाहतात यासंबंधी काम करते.

या कंपनीच्या सर्व्हेक्षणात पंजाबी अभिनेता दिलजित दोसंद भारताबाहेर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता आहे तर पंजाबी अभिनेत्री नीरु बाजवर दोन नंबर, जिमी शेरगिल तीन नंबरवर आहेत. पंजाबी चित्रपट ऑस्ट्रेलियात सर्वाधीक लोकप्रिय असून त्यापाठोपाठ अमेरिका, न्यूझीलंड, ब्रिटन, पाकिस्तान, कॅनडा याचा नंबर आहे. तामिळी चित्रपट अमेरिका, सिंगापोर, मलेशिया, युएई आणि ब्रिटन मध्ये लोकप्रिय आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)