प्रियांका चोप्रा खरचं पडलीयं का अमेरिकन गायकाच्या प्रेमात?

आत्तापर्यंत देसी गर्ल प्रियांका सिंगल आहे, असेच सर्वांना वाटत होते. पण कदाचित असे नाहीये. या देसी गर्लचा जीव एका ‘फिरंगी बाबू’वर जडला, असे दिसतेय. हा ‘फिरंगी बाबू’ कोण तर अमेरिकन सिंगर निक जोनास अर्थात निकोलस जेरी जोनास. गेल्या काही दिवसांत दोघांमधील जवळीक वाढली आहे. अगदी अलीकडे प्रियांका निकसोबत सुप्रसिद्ध डॉजर्स स्टेडियमवर दिसली. 

२०१७ मध्ये ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर प्रियांका व निक सोबत दिसले होते. निकची ‘डेट’ बनून प्रियांका या रेड कार्पेटवर उतरली होती. प्रियांका व निकची ओळख अमेरिकन टीव्ही सीरिज ‘क्वांटिको’च्या सेटवर झाली होती. आत्तापर्यंत प्रियांका निकसोबतच्या रिलेशनशिपच्या बातम्या नाकारत आली आहे. पण सध्या दोघांचे सोशल मीडियावरचे व्हिडिओ आणि फोटो बघता, दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)