प्रियांका चोप्राने उरकले गुपचूप लग्न?

बॉलिवूडमध्ये सध्या सोनम कपूर पुढच्या महिन्यात लग्न करणार असल्याची चर्चा आहे. तर दीपिका पदुकोण देखील या वर्षाअखेरीस लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. त्यातच आता प्रियांका चोप्रानेही गुपचूप लग्न उरकल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

प्रियांका सध्या आपल्या हॉलिवूड प्रोजेक्टमधून ब्रेक घेऊन मायदेशी परतली आहे. सध्या ती आसममध्ये असून, आपल्या प्रवासातील काही फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमुळेच तिच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. कारण, इंस्टाग्रामवर तिने शेअर केलेल्या फोटोंपैकी एका फोटोमध्ये तिच्या हातात ब्रेसलेटसारखी वस्तू दिसत आहे. नेटिझन्सच्या मते, ही वस्तू ब्रेसलेट नसून, मंगळसूत्र आहे. आणि तिने गुपचूप लग्न उरकले आहे. प्रियांका गेल्या दोन वर्षांपासून हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे तिने लग्न केल्याची चर्चा खरी असल्यास, तिचा पती कोण? याबाबत सोशल मीडियातून विविध तर्क लढवले जात आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)