प्रियांका गांधींच्या रोलमध्ये आहना खुराना

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावरच्या “द ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या सिनेमामध्ये प्रियाका गांधींच्या रोलसाठी आहना खुरानाची निवड झाली आहे. आहना खुरानाला आपण अगदी अलिकडे “लिपस्टीक अंडर माय बुरखा’मध्ये बघितले होते. आता “ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर’मधील अन्य कलाकारांबरोबर ती कामाला सुरूवात करणार आहे. या सिनेमात राहुल गांधींच्या रोलसाठी मूळ ब्रिटीश अभिनेता अर्जुन माथुरचे नाव निश्‍चित झाले होते.

आहनाच्या आगोदर अक्षय खन्नाचाही या सिनेमामध्ये समावेश झाला आहे. मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार संजय बारू यांच्या रोलमध्ये अक्षय खन्ना असणार आहे. हा सिनेमादेखील संजय बारूनी लिहीलेल्या “द ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर; द मेकिंग ऍन्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग’ या पुस्तकावरच आधारलेला असणार आहे.

सिनेमामध्ये मनमोहन सिंग यांची मध्यवर्ती व्यक्तिरेखा साकारणार आहेत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर. या सिनेमाला कोणताही राजकीय अजेंडा नसेल. या सिनेमामध्ये भारतीय राजकारणाची पार्श्‍वभुमी आणि भली मोठी स्टार कास्ट असल्याने त्याची तुलना 1982 मध्ये रिचर्ड ऍन्टनबरोंच्या “गांधी’ बरोबर होत आहे. मनमोहन सिंग यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूकांपूर्वी 21 डिसेंबरला रिलीज होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)