प्रियांका आणि निकच्या लग्नाला येणार ‘ही’ खास विदेशी पाहुणी

देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचा साखरपुडा झाला आणि आता त्यांच्या लग्नाची तयारीही सुरू झाली आहे. या लग्नाला बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील सेलिब्रिटी येणार आहेत, हे उघड आहे. त्याशिवाय आणखी एक सेलिब्रिटी या समारंभाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ती म्हणजे ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स हॅरी यांची पत्नी मेगन मर्केल. तिच्याबरोबर प्रिन्स हॅरी देखील या समारंभाला येण्याची शक्यता आहे.

यावर्षी 16 मे रोजी मेगन मर्केल आणि प्रिन्स हॅरी यांचा विवाह झाला होता. त्याला प्रियांका उपस्थित राहिली होती. आता आपल्या विवाहाला ती मेगनला बोलावणार आहे. राजघराण्यातील व्यक्ती सहसा अशा खासगी समारंभामध्ये सहभागी होत नसतात. पण राजघराण्यातील व्यक्तींनी आपल्या मित्रमंडळींच्या समारंभामध्ये जाऊच नये, असा कोणताही प्रोटोकॉल नाही. त्यामुळे हे राजघराण्यातील युवा दाम्पत्य प्रियांकाच्या विवाहात नक्की येतील. विवाहापूर्वी मेगन हॉलिवूडमध्ये सक्रिय होती. प्रियांका गेल्या काही वर्षांपासून हॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. त्याशिवाय ती एक ह्युमॅनेटेरियन देखील आहे. गेल्या चार वर्षांपासून या दोघींची चांगली मैत्री आहे. प्रियांकाने इन्स्टाग्रामवर दोघींचे एकत्र फोटोही शेअर केले आहेत. प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्यातील रिलेशनशीप तर 2016 पासून सुरू झाली. म्हणजे त्यापूर्वीपासून दोघी जणी मैत्रिणी आहेत.

निकबरोबर साखरपुडा झाल्यावर प्रियांकाने निकला एक पार्टी दिली. त्यानंतर त्याला घेऊन ती सेंट कॅथरीन अनाथाश्रमामध्ये गेली. या अनाथाश्रमामध्ये अनाथ मुलींना आश्रय दिला जातो. या अनाथाश्रमाशी प्रियांकाचे खूप जुने ऋणानुबंध आहेत. या अनाथाश्रमासाठी ती वेळ आणि पैसाही देत असते. इथल्या मुली ती आपल्या मुलीच असल्याप्रमाणे सांगते. या मुलांशी निकची ओळख करून दिल्यावर प्रियांकाने सगळ्यांचा एक ग्रुप फोटो काढला आणि तो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आपल्या भावी पतीला आपल्या मुलींना भेटवल्याचा आनंद प्रियांकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. मात्र आपल्या भावी पत्नीच्या मुलींना भेटल्याचा आनंद निकच्या चेहऱ्यावर कसा असेल?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)