प्रियांका-अभिषेक जोडी पुन्हा झळकणार

बॉलीवुडची देशी गर्ल आणि प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा सलमान खाननंतर अभिषेक बच्चन सोबत चित्रपटात काम करणार आहे. “भारत’ या चित्रपटानंतर आणखी एक चित्रपट प्रियांकाना फायनल केल्याचे समजते. यात ती पुन्हा एकदा ज्युनियर बी अभिषेक बच्चन सोबत झळकणार आहे. हॉलीवुडमध्ये दमदार भूमिका साकारल्यानंतर दोन वर्षानंतर प्रियांका पुन्हा एकदा बॉलीवुडमध्ये वापसी करत आहे.

प्रियांका सलमानच्या “भारत’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. यानंतर ती अभिषेक बच्चन सोबत एका चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाची कथानक 13 वर्षांच्या आयशा चौधरी हिच्यावर आधारित आहे. गुरुग्राम येथे राहणारी आयशा एका व्याख्याता होती जिचे 2015मध्ये निधन झाले. आयशाला “इम्यून डफिशिएिसी डीसआर्डर’ या आजाराने ग्रस्त असतानाही तिने प्रसिद्ध टॉक शोजमध्ये व्याख्यान दिले होते. अभिषक आणि प्रियांका या चित्रपटात तिच्या आई-वडिलांची भूमिका साकारणार आहेत. यापूर्वी 2008मध्ये “दोस्ताना’ या चित्रपटात या जोडीने एकत्रित काम केले होते. आता ही जोडी पुन्हा एकदा एकत्रित येत असून प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सूकता लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)