प्रियांकाला लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी भाईजान रिसेप्शन पार्टीत!

बॉलीवूडमधील देशीगर्ल प्रियांका चोप्रा आणि भाईजान अर्थात सलमान खान या दोघांमध्ये काही दिवसांपासून रुसवे फुगवे सुरू होते. प्रियांकाने ऐनवेळी त्याच्या बिग बजेट “भारत’ चित्रपटातून माघार घेतल्याने सलमान प्रियांकावर खूपच नाराज होता. प्रियांकाचे अव्यवाहारिक वागणे त्याला अजिबात पटले नव्हते. त्यामुळे त्याने अस्पष्टपणे प्रियांकाच्या वागण्यावर बोचरी टीका करत आपली नाराजी अनेकवेळा बोलून दाखवली होती. इतकेच नाही तर प्रियांकासोबत पुन्हा काम न करण्याचा निर्णयही त्याने घेतला होता.

मात्र या साऱ्या गोष्टी बाजूला ठेवत सलमान प्रियांकाला लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी रिसेप्शन पार्टीत पोहोचला होता. मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये प्रियांकाने बॉलिवूडसाठी रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत रणवीर-दीपिकापासून ते बॅडमिंटनपटू सायना नेहवालचीही उपस्थिती पाहायला मिळाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पण, या सगळ्यात लक्ष वेधले ते बॉलिवूडच्या भाईजान सलमानच्या उपस्थितीने. सलमान आणि प्रियांका यांच्यात “भारत’ चित्रपटावरून दुरावा निर्माण झाला होता. प्रियांकावर सलमान नाराज होता. मात्र रिसेप्शन पार्टीत जे पाहुणे सर्वात आधी पोहोचले त्यात सलमान होता. या दोघांनाही सुखी जीवनासाठी भरभरून सलमानने शुभेच्छाही दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)