प्रियांकाच्या जाऊबाई जोरात

देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि हॉलिवूडचा गायक निक जोनास यांच्या विवाहाचे सर्व सोहळे पार पडले आहेत. जोधपूरच्या उम्मेद पॅलेसमधील आठवड्याभराच्या या सोहळ्यानंतर दिल्लीत भव्य रिसेप्शनही झाले आणि आता हे नवदाम्पत्य अमेरिकेला रवाना होते आहे. या लग्नामध्ये प्रियांका आणि तिच्या मैत्रिणींनी मिळून भरपूर दंगामस्ती केली. मेंदी, नाच-गाणी, आतषबाजी आणि खास राजस्थानी मिठाईवर तावही मारला गेला. या सगळ्याबरोबर मिडीयामध्ये सर्वाधिक चर्चा आणखी एका गोष्टीची झाली होती. प्रियांकाची होणारी जाऊ मिडीयाच्या चर्चेत राहिली. निक जोनासच्या मोठ्या भावाची म्हणजे जो जोनासची होणारी बायको सोफी टर्नर ही विवाह समारंभामध्ये विशेष झळकत होती.

सोफी टर्नर ही अमेरिकेतल्या टिव्ही एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीमधील सर्वाधिक चर्चेतील सेलिब्रिटी आहे. टिव्ही सिरीज “गेम ऑफ थ्रोन्स’मध्ये सांस स्टार्क नावाची व्यक्तिरेखा सोफी साकारते आहे. या सिरीजमुळेच तिची इंटरनॅशनल टिव्ही स्टार म्हणून ओळख निर्माण झाली. स्क्रीन अॅक्‍टर्स अॅवॉर्डसाठी तिला चार वेळा नॉमिनेशनही मिळाले आहे. “द थर्टीन्थ टेल’, “मी’ या टिव्ही फिल्म्समध्येही तिने काम केले आहे. बेस्ट सपोर्टिंग अॅक्‍टरसाठीचे नॉमिनेशनही तिला मिळाले होते. याशिवाय “बरेली लिथल’ या कॉमेडी फिल्ममधील तिचा रोलही खूप गाजला होता. “गेम ऑफ थ्रोन्स’ या सिरीजमध्ये तिचा रोल निगेटिव्ह आहे. पण प्रत्यक्षात ती अगदी उलट म्हणजे आनंद, उत्साह, चैतन्य आणि प्रचंड हास्यविनोद करणारी महिला आहे.

प्रियांकाच्या लग्नाला आवर्जुन उपस्थित असलेली सोफी प्रियांका प्रमाणेच देसी अंदाजात वावरत होती. तिने चक्क भारतीय पोषाख परिधान केला होता. त्याशिवाय मेंदी, संगीत, रिसेप्शन यासगळ्यामध्ये ती अगदी उत्साहाने सहभागी झाली होती. संगीताच्या कार्यक्रमात तर तिने सगळ्यांबरोबर बॉलिवूडमधील डान्सवर परफॉर्मन्सही केला होता. याशिवाय तिने प्रियांकाबरोबर मस्त फुगडीही खेळली. त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरलही झाला. प्रियांकाच्या लुकपेक्षा तिची ही जाऊ सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनली होती. आता देसी गर्लने बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील अंतर कमी करून टाकले आहेच. त्यामुळे सोफीला नक्की कोणीतरी बॉलिवूड प्रोड्युसर आपल्या सिनेमामध्ये घेण्याचा प्रस्ताव मांडू शकतो. जाऊबाई जोरात आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)