प्रियंका गांधी सक्षम ! ; लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फायदा होईल- राहुल गांधी

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच काँग्रेसने मोठा डाव खेळला आहे. प्रियांका गांधी यांची औपचारिकरीत्या राजकारणात एंट्री झाली असून त्यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांका यांच्याकडे उत्तर प्रदेश पूर्वची जबाबदारी दिली आहे. तर पश्चिमेची जबाबदारी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे देण्यात आली आहे.  प्रियांका गांधी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कार्यभार स्वीकारणार आहेत.

दरम्यान, प्रियंका गांधी यांच्या राजकारण प्रवेशाने आपल्याला आनंद झाल्याचे गांधी यांनी म्हटले आहे. तसेच त्या लोकसभा निवडणुकीत चांगली मदत करतील, अशी अपेक्षा देखील राहुल गांधींनी व्यक्त केली.  प्रियंका आणि ज्योतिरादित्य शिंदे हे उत्तरप्रदेशात कॉंग्रेसच्या विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार करतील आणि या राज्याच्या राजकारणाला नवीन दिशा देतील असेही राहुल गांधी यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)