प्रियंकाचे ‘यंग अॅंण्ड फ्री’ गाणे होत आहे व्हायरल

नवी दिल्ली :  आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंत भुरळ पाडणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा. दर्जेदार अभिनय ही जरी प्रियंकाची ओळख असली तरी ती सुमधुर आवाज ही देखील तिची ओळख झाली आहे. 

‘एक्झॉटिक’ आणि ‘इन माय सिटी’ यांसारख्या सुपरहिट गाण्यांनंतर बॉलिवूड-हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा आपल्या आवाजात नवीन गाणे घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हे गाणं युट्युबवर आल्यापासून प्रेक्षक यावर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. अवघ्या काही दिवसात हजारो जणांनी या गाण्याला पसंती दर्शवली आहे. ‘यंग अँड फ्री’ हे गाणे प्रियांकाने स्वतः लिहिले असून ऑस्ट्रेलियातील प्रसिध्द डीजे विल स्पार्कने संगीतबद्ध केले आहे. प्रियांकाने सोशल मीडियावरुन तिचे नवीन गाणे रिलीज झाल्याची बातमी चाहत्यांना दिली. गाण्याप्रतीच्या आपल्या भावना तिने सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.
‘मी माझ्या आयुष्यातील एका अनमोल क्षणी हे गाणं लिहीलं होतं. या गाण्याला स्वातंत्र्याच्या उद्देशाने लिहिलेले आहे. मग ते आपल्या आयुष्यातील कोणत्याही बाबतीतील स्वातंत्र्य असेल. यंग आणि फ्री होणं एक स्टेट ऑफ माइंड आहे, ज्याची आपल्या सगळ्यांना या जगात राहताना गरज आहे. मला हे गाणं ज्या पद्धतीने लिहीलं आहे ते सर्वात जास्त भावले आहे’ असे तिने आपल्या गाण्याविषयी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)