प्रिन्स चार्ल्स यांना प्रमुख नेमण्यास राष्ट्रकुल नेत्यांचा पाठिंबा

लंडन – राष्ट्रकुल संघटनेच्या अध्यक्षपदी युवराज चार्ल्स यांच्या नियुक्तीच्या प्रस्तावाला राष्ट्रकुल नेत्यांनी आज पाठिंबा दिला. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी कालच आपल्यानंतर युवराज चार्ल्स यांनी एकदिवस या संघटनेचे नेतृत्व करावे, अशी आपली प्रामाणिक ईच्छा असल्याचे मटले होते.

आज राष्ट्रकुलातील देशांच्या प्रमुखांकडून मंजूरी मिळाल्याने 69 वर्षीय युवराज चार्ल्स हेच राष्ट्रकुल संघटनेचे भावी अध्यक्ष असणार आहेत, हे निश्‍चित झाले. सध्या सुरू असलेल्या चोगम सदस्य प्रमुखांच्या बैठकीच्या समारोपप्रसंगी यासंदर्भातल्या अधिकृत निर्णयाची घोषणा होणे अपेक्षित आहे. एलिझाबेथ द्वितीय यांचे निवासस्थान असलेल्या राजप्रासादातील वॉटर्लू चेंबरमधून ही घोषणा केली जाईल.

ब्रिटीश साम्राज्याचे राज्य प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ज्या देशांवर होते, तेथील आता स्वतंत्र झालेल्या देशांची संघटना म्हणून राष्ट्रकुल संघटना ओळखली जाते. आफ्रिकेतील अलिकडेच स्वतंत्र झालेले देश, अमेरिका, आशिया, युरोपाबरोबर पॅसिफिक भूभागातील देश अलिकडच्या काळात राष्ट्रकुलामध्ये सहभागी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)