प्रिथा वर्तीकर आणि शौनक शिंदेला एकेरीत विजेतेपद

प्रौढ एकेरीत वैभव दहिभातेला विजेतेपद


जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा

पुणे – प्रिथा वर्तीकर आणि शौनक शिंदे यांनी 18 वर्षांखलील खेळाडूंच्या गटांत विजेतेपद पटकावताना शारदा स्पोर्टस सेंटर आयोजित जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेचा आजचा दिवस गाजविला. स्पर्धेतील इतर प्रकारांत 21 वर्षांखालील मुलांच्या गटात करन कुकरेजा आणि शौनक शिंदे यांनी अंतीम फेरीत प्रवेश केला आहे तर मुलींच्या गटात मृन्मयी रायखेलकरने विजेतेपद पटकावले आहे.

प्रौढ एकेरीत वैभव दहिभातेनेविजेतेपद पटकावले आहे तर महिलांच्या गटात सलोनी शहा आणि इशा जोशी यांनी अंतीम फेरीत आपला प्रवेश निश्‍चीत केला आहे.

शारदा स्पोर्टस सेंटर, एरंडवणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत 18 वर्षांखलील महिला खेळाडूंच्या गटांत झालेल्या उपान्त्य फेरीतील सामन्यांमधील पहिल्या सामन्यात मृन्मयी रायखेलकरने राधीका सकपाळहीचा 11-4, 7-7, 7-11, 11-7, 9-11, 11-5 असा संघर्षपूर्ण पराभव करत अंतीम फेरीत प्रवेश मिलवला होता तर दुसऱ्या सामन्यात प्रिथा वर्तीकरने प्रिती गाढवेचा 11-7, 11-6, 11-1, 11-7 असा एकतर्फी पराभव करत अंतीम फेरीत प्रवेश केला. अंतीम सामन्यात प्रिथा वर्थीकरने मृन्मयी रायखेलकरचा 11-13, 11-8, 11-3, 7-11, 11-9, 11-6 असा संघर्षपूर्ण पराभव करत एकेरीचे विजेतेपद पटकावले.

18 वर्षांखलील पुरुष खेळाडूंच्या गटांत झालेल्या उपान्त्य फेरीतील सामन्यांमधील पहिल्या सामन्यात शौनक शिंदेने श्रीयश भोसलेचा 11-5, 11-8, 12-10, 11-9 असा सरळ सेट मध्ये पराभव करत अंतीम फेरीतील आपले स्थान पक्‍के केले. दुसऱ्या सामन्यात आरुश गळपल्लीने करन कुकरेजाचा 11-5, 9-11, 8-11, 11-4, 8-11, 13-11, 11-8 असा संघर्ष पूर्ण पराभव करत अंतीम फेरीत प्रवेश केला. तर अंतीम सामन्यात शौनक शिंदेने आरुश गळपल्लीचा 11-4, 6-11, 12-10, 10-12, 11-7, 11-9 असा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले.

21 वर्षांखालील मुलांच्या गटात उपान्त्य फेरीतील पहिल्या सामन्यात शौनक शिंदेने रजत कदमचा 7-11, 11-9, 11-5, 13-11, 12-10 असा पराभव करत अंतीम फेरीत प्रवेश केला. तर दुसऱ्या सामन्यात करन कुकरेजाने आरुश गळपल्लीचा 11-9, 11-4, 11-4, 11-8 असा पराभव करत अंतीम फेरीतील आपले स्थान निश्‍चीत केले.

21 वर्षांखालील मुलिंच्याच्या गटात उपान्त्य फेरीतील पहिल्या सामन्यात अंकिता पटवर्धनने इशा जोशीचा 11-6, 11-7, 11-6, 5-11, 9-11, 11-7 असा पराभव करत अंतीम फेरीत आपला प्रवेश निश्‍चीत केला. तर दुसऱ्या सामन्यात मृन्मयी रायखेलकरने सलोनी शहाचा 11-3, 9-11, 13-11, 11-9, 11-9 असा पराभव करत अंतीम फेरीत धदक मारली. तर अंतीम सामन्यात मृन्मयी रायखेलकरने अंकीता पटवर्धनचा 11-2, 11-8, 13-11, 1-11, 9-11, 9-11, 7-11, 13-11 असा संघर्षपूर्ण पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

पुरुषांच्या प्रौढ एकेरीच्या उपान्त्य फेरीतील पहिल्या सामन्यात सनत बोकिलने सुयोग पाटीलचा 11-9, 15-13, 11-6, 11-4 असा सरळ सेत मध्ये पराभव करत अंतीम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या सामन्यात वैभव दहिभातेने अजय कोठावलेचा 11-6, 6-11, 11-8, 11-3, 11-6 असा पराभव करत अंतीम फेरीत आपले स्थान पक्‍के केले. यावेळी अंतीम सामन्यात वैभव दहिभातेने सनत बोकिलचा 12-10, 11-8, 13-11, 12-10 असा एकतर्फी पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

महिलांच्या प्रौढ एकेरीच्या उपान्त्य फेरीतील पहिल्या सामन्यात इशा जोशीने फौझीया मेहेरलीचा 11-5, 11-9, 11-2, 14-12 असा एकतर्फी पराभव करत अंतीम फेरीत धड्याक्‍यात प्रवेश केला तर दुसऱ्या सामन्यात सलोनी शहाने शृती गभानेचा 6-11, 11-9, 5-11, 7-11, 11-9, 11-8, 11-6 असा संघर्ष पूर्वक पराभव करत अंतीम फेरीत प्रवेश केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)