प्रा. सतीश जंगम यांच्या शोधनिबंधास पुरस्कार

फलटण – कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र शिक्षक विचार मंचच्या कोल्हापूर येथील 19 व्या अर्थशास्त्र परिषदेत प्रा. सतीश जंगम यांच्या शोधनिबंधास सर्वोत्कृष्ठ शोधनिबंध पुरस्कार मिळाला असून सलग तीन वर्षे हा पुरस्कार त्यांनी मिळवला आहे.

कोल्हापूर विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर व कोकण विभागातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील अर्थशास्त्र शिक्षकांच्या विचार मंचचे 19 वे अधिवेशन देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉमर्स कॉलेज कोल्हापूर येथील दि. 1 व 2 डिसेंबर रोजी पार पडले. यामध्ये त्यांच्या बॅंकिंग क्षेत्रातील बदलते प्रवाह या शोधनिबंधास पुरस्कार मिळाला. त्यांचा प्रा. डॉ. डी. के. मोरे, प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील. प्रा. आर. एन. पाटील. प्रा. शरद शेटे. प्रा.सौ. उषा काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

त्यांचे माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर, फलटण पालिकेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, स्वराजचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर, प्राचार्य रणदेव खराडे, अरविंद मेहता, प्रा. रमेश आढाव, यशवंत खलाटे, युवराज पवार, राजेंद्र नागटीळे, मुख्याध्यापक सुनिल सूर्यवंशी, शिवाजी पवार, अजित गायकवाड, प्रा. रविंद्र कोकरे, आत्माराम सस्ते, दशरथ लोखंडे, रवींद्र शिंदे व रविंद्र लडकत यांच्यासह मान्यवरांनी अभियंता एन. बी. भोई यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)