प्रा. श्रीमंत कोकाटे यांना झेड प्लस सुरक्षा द्या

मराठा सेवासंघ व संभाजी ब्रिगेडची मागणी

सातारा – इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे यांच्यावर हल्ला करण्याचा सनातन संघटनेचा कट असून शासनाने तात्काळ कोकाटे यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.

राज्यभर सनातनी विकृतींकडून सुरू असलेल्या भ्याड हल्ल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रा. श्रीमंत कोकाटे यांच्यावर हल्ला करण्याचा सनातन संस्थेचा कट असल्याचा नुकताच उघडकीस आला आहे. प्रा. कोकाटे हे संपूर्ण राज्यभर विचार प्रबोधनाच्या माध्यमातून फिरत असतात. या दरम्यान, त्यांना धमकावणे, कार्यक्रमांमध्ये अडथळे आणणे, फोनद्वारे धमकी देणे, गाडीवर हल्ला करणे असे भ्याड प्रकार सुरू असून त्यांच्या जीवितास धोका असल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने तातडीने निर्णय घेवून प्रा. कोकाटे यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी तसेच संपुर्ण देशात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या सनातन संस्थेवर कायमची बंदी घालून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब डेरे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पै. अनिल जाधव-रोमण, जोतीराम वाघ, चंद्रकांत बर्गे, सुनिल भोसले, बबनराव करडे, रफिक शेख, संभाजी ढाणे, आरिफ शेख, उमर शेख, आदित्यनाथ बिराजे, लहू सावंत, सुर्यकांत चव्हाण, सय्यद मुज्जफर, राजू माने, कृष्णा शेलार, सागर सुर्यवंशी, विक्रम फडतरे, शशिकांत पाटील, निशिकांत भोसले, सुनिल जगदाळे आदी.उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)