प्रा. शशिकांत गाडे यांच्याकडे तीन विधानसभा संघांची जबाबदारी

नगर: शिवसेनेच्या नगर दक्षिणमधील तीन विधानसभा मतदार संघाची जबाबदारी राजेंद्र दळवी यांच्याकडे देत त्यांची दक्षिण जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नगर दक्षिणचे विद्यमान जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्या अधिकार अप्रत्यक्षरित्या पक्षप्रमुखांना कमी केल्या असल्याचे हे संकेत आहेत. दळवी यांच्या नियुक्तीमुळे प्रा. गाडे यांच्याकडे तीन विधानसभा मतदार संघाची जबाबदारी राहणार आहे.

या नियुक्तांचे निर्णय शिवसेनेच्या मुखपत्रातून प्रसिद्ध झाले आहेत. दळवी यांच्यावर कर्जत-जामखेड, शेवगाव-पाथर्डी आणि राहुरी मतदार संघाची जबाबदारी असणार आहे. प्रा. गाडे यांच्याकडे नगर शहर, पारनेर, श्रीगोंदे या तीन मतदार संघाची जबाबदारी असणार आहे. पाथर्डीच्या तालुकाप्रमुखपदी अंकुश चितळे, शेवगावच्या तालुकाप्रमुखपदी ऍड. अविनाश मगरे यांच्या नियुक्‍त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी अंधारात असल्याने या निर्णयाविषयी अनेक तर्कविर्तक लावले जात आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रा. गाडे यांनी विधानसभा मतदार संघाची जबाबदारी विभागून दिल्याची माहिती दिली आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. प्रा. गाडे यांनी प्रचारात महत्त्वाची भूमिका बाजली आहेत. त्यांचे पूत्र योगीराज गाडे हे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. असे असताना प्रा. गाडे यांच्या जिल्हाप्रमुखपदाचे पक्षप्रमुखांनी अधिकार कमी करत शंकांना जागा दिल्याचे स्थानिक पदाधिकारी खासगीत बोलत आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुखांच्या या निर्णयावर प्रा. गाडे समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचीही काही समर्थकांनी तयारी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)