प्रा. रेश्‍मा पांडुरंग यादव -निर्मळ यांची सरचिटणीसपदी निवड

पानशेत – खानापूर (ता. हवेली) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शाखेत कार्यरत असलेल्या प्रा. रेश्‍मा पांडुरंग यादव निर्मळ यांची पुरंदर तालुका राष्ट्रवादी शिक्षक सेल संघटनेच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात करीत असलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.
श्री क्षेत्र भुलेश्वर माळशिरस येथे तेल्याभुत्याच्या मानाची कावडीसमोर भुलेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि पुरंदर तालुका राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अध्यक्ष माजी सरपंच अरुण तानाजी यादव यांनी त्यांना निवडीचे पत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी दौंड शुगरचे शेतकी अधिकारी गणेश ढोले, सरपंच सदाशिव डोंबाळे, सुनील यादव, भाऊ यादव, प्रकाश यादव, रमेश गायकवाड, संतोष यादव विलास यादव, रिलायन्स इंडस्ट्रीजमधील मेजर पी. एस. यादव, माळशिरसचे सरपंच, ग्रामस्थ व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)