प्रा. रमेश आढाव “आदर्श पत्रकार भूषण” पुरस्काराने सन्मानित

फलटण ः पुरस्कार स्वीकारताना प्रा. रमेश आढाव शेजारी मान्यवर.

फलटण, दि. 15 (प्रतिनिधी)- महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन या पत्रकार संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम कामगिरी केलेल्या व्यक्तिमत्त्वांना “दि प्राईड ऑफ महाराष्ट्र” पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यामध्ये येथील ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांचा समावेश आहे. नवी मुंबई, (वाशी) येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात दिग्गजांच्या उपस्थितीत “दि प्राईड ऑफ महाराष्ट्र” राज्यस्तरीय आदर्श पत्रकार भूषण पुरस्कार देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी आ. मंदा म्हात्रे, हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, नवी मुंबई महापौर जयवंत सुतार, सहा. पोलीस आयुक्त सुधीर कुडाळकर, विश्वकर्मावंशीय समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नागोराव पांचाळ, विश्वविक्रमविर अक्षरगणेश कलाकार राज कांदळगावकर, नगरसेविका दमयंती आचरे, संस्थाध्यक्ष डॉ. राजीव लोहार, महिला विभाग अध्यक्षा सौ. मनिषा लोहार मान्यवर उपस्थित होते.

 

-Ads-

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)