प्रा. मोरे महाविद्यालयातर्फे माहिती अधिकार आठवडा

पिंपरी – महापालिकेतर्फे 6 ते 12 ऑक्‍टोबर हा माहिती अधिकार आठवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने महापालिका व प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातर्फे “माहिती अधिकार कायद्यातील तरतुदी’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी उपस्थितांना माहिती अधिकार कायद्याचा इतिहास, पार्श्‍वभूमी, कायद्यातील तरतुदी, महत्त्व, सध्याच्या काळात कायद्याचा होत असलेला दुरुपयोग आदी विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त अण्णा बोधडे, कल्पना साळवी, प्रदीप कोठावदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. जी. चासकर, उपप्राचार्य डॉ. तुषार शितोळे, डॉ. अभय खंडागळे आदी उपस्थित होते. प्रदीप कोठावदे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)