प्रा. बाळ आपटे दालन युवकांसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री 

मुंबई – भारताच्या इतिहासात विद्यार्थी चळवळीचे मोठे योगदान आहे. प्रा. बाळ आपटे यांचा देखील विद्यार्थी चळवळीत महत्त्वाचा वाटा आहे. प्रा. बाळ आपटे दालनामुळे विद्यार्थ्यांना विद्यार्थी चळवळीचे महत्त्व समजण्यास मदत होईल. प्रा. आपटे यांचे हे दालन युवकांना प्रोत्साहन देईल आणि त्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरचे नेतृत्त्व निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

राष्ट्र उभारणीसाठी विद्यार्थी व युवक चळवळीचे योगदान देणाऱ्या प्रा. बाळ आपटे दालनाच्या डिजीटल अनावरणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर पार पडला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, आमदार पराग अळवणी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख, वर्षा तावडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रा. बाळ आपटे हे एक समर्पित नेतृत्व होते. त्यांनी अनेक युवक, विद्यार्थ्यांना घडवले. युवकांमधील नेतृत्व गुण विकसित केले. प्रसिद्धीपासून दूर राहून ते आपले काम करीत राहिले. एक प्रथितयश वकील, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षण चळवळीला दिशा देणारे दिशादर्शक म्हणून त्यांनी स्वतःची छाप उमटवली. प्रत्येक काम आणि जबाबदारी निष्ठेने, मेहनतीने करत राहिले. हे काम करताना त्यांनी स्वतःचे वेगळेपण जपले. प्रा. बाळ आपटे यांची छाप असलेले अनेक विद्यार्थी समाजात आहेत. आजच्या घडीला युवकांना राष्ट्रीय युवाशक्तीसाठी प्रेरित होणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःपुरता विचार न करता राष्ट्राचा विचार करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

महसूलमंत्री पाटील म्हणाले, प्रा. बाळ आपटे यांनी विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम केले. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात विद्यार्थी चळवळीचे महत्व मोठे आहे. प्रा. बाळ आपटे दालन विद्यार्थी व युवक चळवळींचे राष्ट्रीय उभारणीतील योगदान यामुळे विद्यार्थ्यांना चळवळीचा इतिहास समजण्यास मदत होणार आहे.

तावडे म्हणाले, राष्ट्र उभारणीमध्ये युवक चळवळीचे मोठे योगदान असते. या नव्या दालनामुळे आजच्या युवक आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थी चळवळीचे महत्व, इतिहास, विद्यार्थी चळवळीने विद्यार्थ्यांसाठी केलेले काम समजण्यास मदत होणार आहे. या दालनाचे आज डिजीटल उद्‌घाटन करण्यात आले असून येत्या 19 जानेवारी 2018 ला प्रा. बाळ आपटे यांच्या जयंतीदिनी या दालनाचे उद्‌घाटन होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)