प्रा. काझी यांना राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान

निमसाखर- नेहरू युवा केंद्र, क्रीडा, युवक कल्याण मंत्रालय, भारत सरकारशी संलिग्नित असलेली उरुळी कांचन येथील डॉ. मणीभाई देसाई प्रतिष्ठानचा राष्ट्रसेवा पुरस्कार कळंब (ता. इंदापूर) येथील विश्‍वासराव रणसिंग महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा. हमीद काझी यांना प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्‍तीला प्रतिवर्षी या पुरस्काराने गौरवण्यात येते. प्रतिष्ठानचे पुरस्कार वितरणाचे हे 23 वे वर्ष आहे. पुणे येथील सावित्रीबाई फुले स्मारक भवन येथे डॉ. रविंद्र भोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका समारंभात प्रा. हमीद काझी यांनी सपत्नीक हा पुरस्कार स्विकारला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रा.हमीद काझी हे गेल्या 34 वर्षांपासून रणसिंग महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करीत असून त्यांना यापुर्वीही अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग यांच्या सर्व संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह परिसरातून त्यांचे अभिनंद होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)