प्रायव्हेट फोटो लीक झाल्याने अक्षरा हासनकडून एफआयआर 

काही दिवसांपूर्वी कमल हासनची छोटी मुलगी अक्षरा हासनचा एक प्रायव्हेट फोटो लीक झाल्याचे प्रकरण उघड झाले होते. अक्षराने या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडे एक लेखी तक्रार देऊन एफआयआर दाखल केली आहे. आता सायबर सेल या प्रकरणाचा तपास करायला लागला आहे. हे प्रकरण पोलिसांनी खूपच गांभीर्याने घेतले आहे. अक्षरा हासनचा प्रायव्हेट फोटो कोणी मिळवला आणि व्हायरल केला, याचा शोध घेतला जात आहे.

हा फोटो कोठून व्हायरल झाला आणि तो व्हायरल करणाऱ्याच्या कॉम्प्युटरचा “आयपी’ ऍड्रेस पहिल्यांदा शोधून काढला जाणार आहे. या प्रकरणामुळे अक्षरा मात्र खूपच दुःखी झाली आहे. लोक असे फोटो लीक करून स्वतःचा फायदा करून घेतात आणि असे प्रकार एन्जॉय करतात. मात्र मला मात्र आतून खूप काही गमावल्यासारखे वाटते आहे. एखाद्या तरुण मुलीचे खासगी फोटो उघड करून तिला बदनाम करणे खूपच दुर्दैवी आहे. जेंव्हा देशभर “मी टू’सारखे अभियान चालू आहे, तेंव्हा अशा तऱ्हेच्या गुन्ह्यामुळे आपले मानसिक खच्चीकरणच झाले आहे, असे अक्षराने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)