प्रामाणिक पंतप्रधान बनण्याचे आश्‍वासन मोदींनी मोडले – राहुल गांधी

हैदराबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली कुठलीच आश्‍वासने पाळली नाहीत. त्यांनी पंतप्रधान म्हणून नव्हे तर देशाचा चौकीदार म्हणून कार्य करण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, प्रामाणिक पंतप्रधान बनण्यासंबंधीचे आश्‍वासनही त्यांनी मोडले, असे टीकास्त्र कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरूवारी सोडले.

विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जात असलेल्या तेलंगणमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या परिषदेत राहुल बोलत होते. परदेशांतून काळा पैसा परत आणून प्रत्येक भारतीयाच्या बॅंक खात्यात 15 लाख रूपये जमा करू. दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करू. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ. शेतमालाला योग्य भाव देऊ अशाप्रकारची अनेक आश्‍वासने मोदींनी दिली. मात्र, त्यापैकी कुठलीच पाळली नाहीत. मोदींसारखी बडी आश्‍वासने मी कधीच देणार नाही. जनतेशी खोटे बोलण्याची सवय मला नाही.

-Ads-

आश्‍वासने हा विश्‍वासार्हतेचा भाग असल्याने त्यांच्याकडे मी गांभीर्याने पाहतो. पंजाब आणि कर्नाटकमधील शेतकऱ्यांना मी कर्जमाफीचे आश्‍वासन दिले. त्या राज्यांत सत्तेवर आल्यानंतर ते पूर्णही केले, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी तेलंगणचे काळजीवाहू मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्यावरही निशाणा साधला. नव्या राज्याची चांगली उभारणी करण्याची सुवर्णसंधी राव यांना लाभली होती. मात्र, भ्रष्टाचारात अडकून आणि कौटूंबिक राजवटीला चालना देऊन त्यांनी ती संधी दवडली, अशी टीका राहुल यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)