प्रामाणिकपणा आणि नीतीमूल्यांशी तडजोड नको

आयआयएम शिलॉंगच्या दीक्षांत समारंभात उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन

नवी दिल्ली – उत्तम चारित्र्य बाळगा, प्रामाणिकपणा आणि नीतीमूल्यांशी तडजोड करु नका, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी विद्यार्थ्यांना केले आहे. ते आज मेघालयमध्ये आयआयएम शिलॉंगच्या नवव्या दीक्षान्त समारंभात बोलत होते.

नीतीमूल्यांची पुरती घसरण आणि कायद्यासंबंधीच्या भीतीचा अभाव यामुळे समाजाची वाताहात होते. प्रामाणिकपणा आणि नीतीमूल्य जपणे आवश्‍यक असून कॉर्पोरेट नैतिकतेचे उल्लंघन होता कामा नये, असे राष्ट्रपती म्हणाले.
संयम आणि कृतज्ञतेची आवश्‍यकताही त्यांनी व्यक्त केली. दुसऱ्यांची काळजी घेणे, वस्तू वाटून घेण्याची वृत्ती जोपासण्याचे आवाहन त्यांनी केले. शिक्षण केवळ रोजगारासाठी नसून सक्षमीकरणासाठीही आहे. ज्ञानोपसानेची कास सोडू नका, असे उपराष्ट्रपतींनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)