प्रामाणिकपणाचा प्रत्यय, महत्त्वाची कागदपत्रे असलेली पिशवी परत

निगडी – समाजात अजूनही प्रामाणिकपणा आणि माणुसकी शिल्लक असल्याचे उदाहरण अलीकडेच पहायला मिळाले. आकुर्डीमधील दत्तनगर परिसरात अशोक राजाराम लोखंडे यांना रस्त्यात एक पिशवी सापडली. यात पिशवीमध्ये दिलीप गोसावी यांच्या नावे स्टेट बॅंक ऑफ इंडियातील तीन लाख रुपये मुदत ठेवीचे प्रमाणपत्र आणि इतर महत्त्वाचे कागदपत्रे आढळले. लोखंडे यांनी परिसरात असणाऱ्या भाजपा पिंपरी विधानसभा अध्यक्ष कैलास गणपत कुटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन आपल्या परिसरातील व्यक्‍तीची पिशवी असून आपण ओळखता अशी विचारणा केली. कैलास कुटे आणि त्यांच्या मित्रपरिवाराने तत्परतेने दिलीप गोसावी यांच्याशी संपर्क साधून तो सर्व ऐवज सुपूर्द केला. महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाल्यामुळे हवालदिल झालेल्या दिलीप गोसावी यांना सर्व ऐवज अनपेक्षितपणे सुरक्षित परत मिळाल्याने मनस्वी आनंद झाला. त्यांनी अशोक लोखंडे, कैलास कुटे तसेच त्यांच्या मित्रपरिवाराचे आभार व्यक्‍त केले.
निगडी – सापडलेली पिशवी परत करणाऱ्या लोखंडे यांचे आभार व्यक्‍त करताना.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)