प्राप्तीकरातील सवलतीसाठीची गुंतवणूक (भाग-२)

चालू आर्थिक वर्षातील गुंतवणुकीसाठी शेवटचे ४ महिने हाताशी उपलब्ध आहेत. या चार महिन्यात विविध पद्धतीने आर्थिक नियोजन करून प्राप्तीकरातील सवलत मिळवता येईल.

प्राप्तीकरातील सवलतीसाठीची गुंतवणूक (भाग-१)

गुंतवणुकीचे पर्याय

उत्पन्नाच्या विविध स्तरांवर वेगवेगळ्या टक्केवारीत प्राप्तीकर आकारला जातो. प्राप्तीकर कायदा १९६१ अंतर्गत ८० सी सी ई मध्ये रू.१,५०,०००/- गुंतवणूक केल्यास रू.४६,१५०/-  इतका प्राप्तीकर वाचवता येईल. यासाठी पुढील गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत.

1) ईक्विटी लिंक सेव्हींग स्किम (ELSS )

2) जीवन विम्याचा हप्ता

3) पी.पी.एफ,

4) नॅशनल सेव्हिंग स्किम (NSC )

5) टॅक्स सेव्हिंग बँक डिपॉझिट (५ वर्ष मुदतीचे)

6) ज्येष्ठ नागरिकांसाठीची पेन्शन योजना

7) युनिट लिंक इन्शुरन्स योजना

वर उल्लेख केल्याप्रमाणे योजनांमध्ये गुंतवणूक करून त्या प्रमाणात प्राप्तीकरामध्ये सवलत घेता येते.

ईक्विटी लिंक सेव्हींग स्किम (ELSS ) योजनांमध्ये गुंतवणूकदारांना विविध योजनांमध्ये पुढील प्रमाणे परतावा मिळाला आहे.

– अॅक्सिस लॉंगटर्म ईक्विटी फंड – ५ वर्षांचा परतावा – २१.७५%

– आदित्य बिर्ला सनलाईफ टॅक्स सेव्हिंग फंड – ५ वर्षांचा परतावा – २०.७८%

– ईनव्हेस्को इंडिया टॅक्स सेव्हिंग – ५ वर्षांचा परतावा – २०.८७%

– टाटा इंडिया टॅक्स सेव्हिंग – ५ वर्षांचा परतावा – १९.८७%

– प्रिंसिपल टॅक्स सेव्हिंग फंड – ५ वर्षांचा परतावा – १८.६५%

सदर आर्थिक वर्षातील शेवटचे ४ महिने गुंतवणूकदारांच्या हाताशी उपलब्ध आहेत. या चार महिन्यात आर्थिक नियोजन करून प्राप्तीकरातील सवलत मिळवता येईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)