प्राप्तीकरातील सवलतीसाठीची गुंतवणूक (भाग-१)

चालू आर्थिक वर्षातील गुंतवणुकीसाठी शेवटचे ४ महिने हाताशी उपलब्ध आहेत. या चार महिन्यात विविध पद्धतीने आर्थिक नियोजन करून प्राप्तीकरातील सवलत मिळवता येईल.

प्रत्येक कमावणारी व्यक्ती दरवर्षीप्रमाणे आर्थिक वर्षातील झालेल्या उत्पन्नावर द्यावा लागणाऱ्या प्राप्तीकराचे नियोजन करत असते. अनेकदा वाढते खर्च, हौसमौजेच्या गोष्टी, कौटुंबिक कार्यक्रमासाठी होणारा खर्च करताना प्राप्तीकराचे नियोजन आणि त्यासाठीची गुंतवणूक करण्याकडे दुर्लक्ष होते. त्यासाठी प्राप्तीकरात सवलत मिळण्यासाठीची गुंतवणूक दरमहा करत राहणे संयुक्तिक ठरते. त्यासाठी बँक खात्यातून इलेक्ट्रॉनिक क्लिगरिंग सिस्टीमद्वारे (ईसीएस) गुंतवणुकीची रक्कम वळती करण्याचा पर्याय स्वीकारल्यास दर महिन्याला आपोआप गुंतवणूक होत राहते आणि डिसेंबर-जानेवारी उजाडला की प्राप्तीकर आणि त्यावरील सवलतीसाठीच्या गुंतवणुकीची चिंता करत बसावी लागत नाही. दरवर्षी प्राप्तीकर आकारणीत काही छोटे-मोठे बदल होत असतात.

वित्त मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार यावर्षीप्राप्तीकर आकारणी पुढील प्रमाणे होणार आहे.

-Ads-

आर्थिक वर्ष २०१८ – १९ व मुल्यांकन वर्ष २०१९ – २० या कालावधीसाठी आकारला जाणारा प्राप्तीकर पुढीलप्रमाणे आहे.

उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक स्त्री, पुरूष व एचयूएफ (अविभक्त हिंदू कुटुंब) साठी आकारणी पुढील प्रमाणे…

रू.२,५०,०००/- पर्यंत – कोणतीही प्राप्तीकर नाही.

रू.२,५०,००१ ते रू. ५,००,०००/- पर्यंत – ५% प्राप्तीकर ( ४% स्वास्थ व शिक्षण अधिभार)

रू.५,००,००१ ते रू.१०,००,०००/- पर्यंत – २०% प्राप्तीकर  ( ४% स्वास्थ व शिक्षण अधिभार)

रू.१०,००,००१ च्या पुढील उत्पन्नावर – ३०% प्राप्तीकर ( ४% स्वास्थ व शिक्षण अधिभार)

ज्येष्ठ नागरिकांसाठी (वय वर्ष ६० च्या  पुढील)

रू.३,००,००० पर्यंत – कोणतीही प्राप्तीकर नाही

रू.३,००,००१ ते ५,००,०००/- पर्यंत – ५% प्राप्तीकर ( ४% स्वास्थ व शिक्षण अधिभार)

रू.५,००,००१ ते १०,००,०००/- पर्यंत – २०% प्राप्तीकर ( ४% स्वास्थ व शिक्षण अधिभार)

रू.१०,००,००१ च्या पुढील उत्पन्नावर – ३०% प्राप्तीकर ( ४% स्वास्थ व शिक्षण अधिभार)

प्राप्तीकरातील सवलतीसाठीची गुंतवणूक (भाग-२)

अतिज्येष्ठ नागरिकांसाठी (वय वर्षं ८० व पुढील..)

रू.५,००,००० पर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही.

रू.५,००,००१ ते १०,००,०००/- पर्यत – २०% प्राप्तीकर ( ४% स्वास्थ व शिक्षण अधिभार )

रू.१०,००,००१ च्या पुढील उत्पन्नावर ३०% प्राप्तीकर ( ४% स्वास्थ व शिक्षण अधिभार )

करप्राप्त उत्पन्न रू.३,५०,०००/- असणाऱ्या प्रत्येकाला रू.२५००/- पर्यंतची करसवलत प्रत्येकाला मिळते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)