प्राप्तिकर विभागाचे काम चालू राहणार

 29 ते 31 मार्च या काळात कार्यालयांना सुट्टी नाही

नवी दिल्ली  -करदात्यांना विवरण भरता यावे याकरीता 29 ते 31 मार्च काळात प्राप्तिकर आणि आयकर सेवा केंद्राची कार्यालये सुरू राहणार आहेत. अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करदात्यांना या काळात काम जास्त असते. त्यामुळे सुट्या असल्या तरी 29 ते 31 मार्च या काळात काम चालू राहणार आहे. त्यामुळे करदात्यांना त्रास होणार नाही. या काळात आस्क केंद्रेही काम करीत राहणार आहेत. या काळात जास्तीत जास्त करदात्यांना विवरण दाखल करता यावे याकरिता आवश्‍यक ती मदत केली जाणार आहे.

यामुळे देशभरातील करदात्यांना मार्च अखेरीस बराच दिलासा मिळाला असल्याची परिस्थिती आहे. दरम्यान, बॅंकांच्या सलग सुट्यांबाबत बॅंक प्रशासनाकडून स्पष्टीकरण समोर आले आहे. त्यानुसार बॅंकांना या आठवड्यात सलग पाच दिवस नव्हे तर केवळ गुरुवारी (29 मार्च) आणि शुक्रवारी (30 मार्च) बॅंका बंद राहणार आहेत. तर 31 मार्च रोजी पाचवा शनिवार असल्याने बॅंका सुरू राहतील. बॅंक प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नव्या परिपत्रकानुसार बॅंकांना फक्त गुरुवारी 29 मार्च रोजी महावीर जयंतीची आणि शुक्रवारी 30 मार्च रोजी गुड फ्रायडेची सुट्टी असेल.

शनिवारी बॅंकेचे कामकाज सुरू राहील. त्यानंतर सोमवारपासून नियमित कामकाज सुरू होईल. या आठवड्यात 5 दिवस सुट्टी असणार नाही, असे बॅंकांच्या प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सीबीएस प्रणालीमुळे वर्षअखेरीस बॅंकांचे काम सोपे झाले आहे. ते शनिवारी सायंकाळी किंवा रविवारी केले जाणार आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)