प्राप्तिकर भरणात मोठी वाढ

नवी दिल्ली: गेल्या आर्थिक वर्षात प्राप्तिकराची वसुली विक्रमी झाली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्‍ट टॅक्‍सेसने (सीबीडीटी) दिलेल्या माहितीनुसार 2017-18 या आर्थिक वर्षात प्राप्तिकराचा भरणा 10.03 लाख कोटी रुपये झाला आहे.

सीबीडीटीच्या अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार 2017-18 या वर्षात प्राप्तिकर विवरण पत्र भरण्याचा देखील उच्चांक झाला असून तब्बल 6.92 कोटी करदात्यांनी कर विवरण पत्र भरले आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या म्हणजे 2016-17 च्या 5.61 कोटींच्या तुलनेत यंदा तब्बल 1.31 कोटी जास्त करदात्यांनी रिटर्न फाइल केले आहे.

या वर्षीही कर विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या सव्वाकोटींनी वाढेल अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. ईशान्य भारताचे प्राप्तिकर खात्याचे मुख्य आयुक्त एलसी जोळी रानी यांच्या सांगण्यानुसार ईशान्य भारतातूनही सात हजार कोटी रुपयांचा प्राप्ती कर जमा झाला असून ही गेल्या वर्षीच्या तुलनेत 16.7 टक्‍क्‍यांची वाढ आहे.

गेल्या वर्षी ईशान्य भारतातून सहा हजार कोटी रुपयांचा प्राप्तिकर जमा झाला होता. तर 2018-19 या आर्थिक वर्षात ईशान्य भारतातून 8,357 कोटी रुपयांच्या इन्कम टॅक्‍सच्या भरण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात आयकर सेवा केंद्रे उभारण्यात येत असून जास्तीत जास्त लोकांना करांच्या जाळ्यात आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे इन्कम टॅक्‍सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)