प्राप्तिकर दात्यासाठी कामकाज चालू

नवी दिल्ली-करदात्यांना विवरण भरता यावे याकरिता 29 ते 31 मार्च काळात प्राप्तिकर आणि आयकर सेवा केंद्राची कार्यालये सुरू राहणार आहेत. अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की करदात्याना या काळात काम जास्त असते. त्यामुळे सुट्या असल्या तरी 29 ते 31 मार्च या काळात काम चालू राहणार आहे.

या काळात आस्क केंद्रेही काम करीत राहणार आहेत. या काळात जास्तीत जास्त करदात्याना विवरण दाखल करता यावे याकरीता आवश्‍यक ती मदत केली जाणार आहे. दरम्यान, बॅंकांच्या सलग सुट्ट्यांबाबत बॅंक प्रशासनाकडून स्पष्टीकरण समोर आले आहे. त्यानुसार बॅंकांना या आठवड्यात सलग पाच दिवस नव्हे तर केवळ गुरुवारी (29 मार्च) आणि शुक्रवारी (30 मार्च) बॅंका बंद राहणार आहेत.

तर 31 मार्च रोजी पाचवा शनिवार असल्याने बॅंका सुरू राहतील. बॅंक प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नव्या परिपत्रकानुसार बॅंकांना फक्‍त गुरुवारी 29 मार्च रोजी महावीर जयंतीची आणि शुक्रवारी 30 मार्च रोजी गुड फ्रायडेची सुट्टी असेल. शनिवारी बॅंकेचे कामकाज सुरू राहील. त्यानंतर सोमवारपासून नियमित कामकाज सुरू होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)