प्राध्यापकांनो, “एआरपीआयटी’ अभ्यासक्रम पूर्ण करा

पुणे – प्राध्यापकांनी प्रभावी अध्यापन व त्यासाठी आवश्‍यक असणारे कौशल्ये विकसित करण्यासाठी “अॅन्युअल रिफ्रेशर प्रोग्रॅम इन टिचिंग'(एआरपीआयटी) अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत. त्यासाठी दूरशिक्षण पद्धतीचे अभ्यासक्रम “स्वयम’ या संकेतस्थळावर उपलब्ध असून, असेही “यूजीसी’ने म्हटले आहे. त्यामुळे प्राध्यापकांना हा अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य झाले आहे.

उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढवण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने “पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग’ सुरू केले आहे. त्या अंतर्गत प्राध्यापकांच्या व्यावसायिक विकासासाठी विविध विद्याशाखांतील ऑनलाइन अभ्यासक्रम “स्वयम’ संकेतस्थळावर मंत्रालयाने उपलब्ध करून दिले आहेत. त्याशिवाय “एआरपीआयटी’च्या अंमलबजावणीसाठी 75 विद्याशाखानिहाय रिसोर्स सेंटर्स निश्‍चित करण्यात आली आहेत. त्याद्वारे संबंधित विद्याशाखांतील अद्ययावत माहिती, घडामोडी, येऊ घातलेले कल, अध्यापनातील सुधारणा, बदललेल्या अभ्यासक्रमासंदर्भात अध्यापन कार्यपद्धती या अनुषंगाने ऑनलाइन प्रशिक्षण साहित्य तयार केले जाईल. प्राध्यापकांच्या रिफ्रेशर ट्रेनिंगसाठी यूजीसीने “एआरपीआयटी’ अभ्यासक्रमांना समकक्षता दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)