प्राध्यापकांच्या मानधन वाढीसाठी प्रस्ताव सादर करा

विद्यापीठाच्या महाविद्यालयांना सूचना; 31 जानेवारीपर्यंत मुदत

पुणे – राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाच्या अध्यादेशातील तरतुदींची पूर्तता करून तासिका तत्त्वावरील सहाय्यक प्राध्यापकांचे दुसऱ्या सत्रातील प्रस्ताव मान्यतेसाठी 31 जानेवारीपर्यंत सादर करा, अशा सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने संलग्नित महाविद्यालयांच्या अध्यक्ष, सचिव यांना दिल्या आहेत.

-Ads-

शासनाने तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन दुप्पटीने वाढविले आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान, शिक्षणशास्त्र आणि विधी या सर्वच शाखांसाठी मानधनात वाढ करण्यात आलेली आहे. आता पदवीस्तरावर प्रति तास 300 रुपयांऐवजी 500 रुपये तर पदव्युत्तर स्तरावर प्रति तास 300 रुपयांऐवजी 600 रुपये याप्रमाणे सुधारित दराने मानधन मिळणार आहे. महाविद्यालयांना उच्च शिक्षण सहसंचालकाकडून विषयांचा कार्यभार तपासून ना-हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. संस्थेने विद्यापीठाची मान्यता घेऊन जाहिरात देऊन नियमानुसार शैक्षणिक अर्हता व पात्रताधारक प्राध्यापकांची निवड स्थानिक निवड समितीमार्फत करावी लागणार आहे.

आता नवीन अटी-शर्तीनुसारच तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची नियुक्‍ती करावी लागणार आहे. विद्यापीठाशी संलग्नित सर्व अनुदानित महाविद्यालयांनी दुसऱ्या सत्रातील प्राध्यापकांचे मान्यतेचे प्रस्ताव सादर करण्यासाठी 1 डिसेंबरपासून दोन महिन्यांची मुदत महाविद्यालयांना देण्यात आली आहे. प्रस्तावांना रुजू दिनांकापासूनच उर्वरित शैक्षणिक वर्षापर्यंत मान्यता देण्यात येणार आहे, असे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाच्या उपकुलसचिवांनी स्पष्ट केले आहे.

विद्यापीठाने प्रस्तावांना मान्यता दिल्यानंतर उच्च शिक्षण सहसंचालकांकडे अनुदान प्राप्त करण्यासाठी महाविद्यालयांना प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी खूप कालावधी लागणार आहे. त्यामुळे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना नियमितपणे अनुदान मिळणे सहजासहजी शक्‍य होणार नसल्याचे चित्र सध्या समोर आले आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून मात्र महाविद्यालयांना सुरुवातीपासूनच सर्व प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)