प्राधिकरण नव्या “घरकुला’च्या तयारीत

पिंपरी – पिंपरी-चिंचवड नगरविकास प्राधिकरणाच्या वतीने आर्थिक, वंचित दुर्बल घटकांसाठी गृहप्रकल्प योजना हाती घेतली आहे. या अंतर्गत पेठ क्रमांक 6 मध्ये विविध तीन गृहप्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता संदीप खलाटे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 नुसार 14 मार्च 1972 रोजी पिंपरी-चिंचवड नगवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना झाली. वैधानिक संस्था असलेल्या पीसीएनटीडीएने भूखंडाचे विकसन करावे, गृहप्रकल्प राबवावे, विविध कारणांसाठी भूखंडाची भाडेतत्त्वावर विक्री करावी, नियोजन प्राधिकरणानुसार बांधकाम परवानगी द्यावी असे उद्दीष्ट निश्‍चित करण्यात आले. त्यासाठी भूवाटप नियमावली, बांधकाम परवानगी नियमावली तयार करण्यात आली. त्यानुसार, पीसीएनटीडीएचा कारभार सुरु आहे. कामगारांना स्वस्तात घरे उपलब्ध करुन देणे हा प्राधिकरणाचा मूळ उद्देश आहे. मात्र, दीर्घ कालावधीपासून प्राधिकरण या उद्देशापासून भरकटले होते. त्यावरुन टीकेची झोड उठल्यानंतर अखेर प्राधिकरणाने विविध गृहप्रकल्प योजना हाती घेतल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या अंतर्गत पेठ क्रमांक सहाच्या परिसरात पुणे आंतरराष्ट्रीय व प्रदर्शन केंद्राच्या (पीआयसीसी) जवळ असलेल्या मोकळ्या जागेत हे गृहप्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पात आर्थिक वंचित घटक गृहयोजना (ईडब्लूएस), अल्प उत्पन्न घटक गृहयोजना (एलआयजी) आणि “रो हाऊस’ अशा तीन योजनांचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी “ईडब्लूएस’ची निविदा प्रक्रिया जाहीर झाली आहे.

“ईडब्लूएस’चा आराखडा तयार झाला असून यामध्ये 3 इमारती असणार आहेत. सुमारे 400 सदनिका उभारण्याचे प्रस्तावित आहे. अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाल्यास याचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. तसेच “एलआयजी’चा देखील आराखडा तयार असून निविदा प्रक्रियेचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तर “रो हाऊस’साठीची निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याची माहिती खलाटे यांनी दिली. 17 “रो हाऊस’ बांधण्याचे नियोजन आहे. “ईडब्लूएस’ची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे यासाठी दोन निविदा देखील आल्या आहेत. परंतु, प्राधिकरणाच्या सभेने निविदाला मंजुरी दिल्याशिवाय ते पूर्णत्वास येत नाही. त्यामुळे सभेची मंजुरी मिळताच कामाला सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)