प्राधिकरण कर्मचाऱ्यांनाही “इलेक्‍शन ड्युटी’

निगडी – लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेपाठोपाठ प्राधिकरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती निवडणूक आयोगाने मागविली आहे.

निवडणुकीत शासकीय कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. मावळ आणि शिरुर या दोन्ही लोकसभा मतदार संघात पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होतो. आगामी लोकसभा निवडणूक व त्या पाठोपाठ येणारी विधानसभा निवडणूक लक्षात घेता, निवडणूक आयोगाला अतिरीक्त कर्मचाऱ्यांची मोठी गरज भासते. जिल्हा प्रशासनाला 65 हजार कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेसह प्राधिकरणाला निवडणुकीसाठी आवश्‍यक कर्मचारी पूर्तता करण्यासंदर्भात मागणी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्राधिकरणाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासकीय) आशाराणी पाटील यांनी प्राधिकरणाच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची यादी काढली आहे. त्यानुसार प्राधिकरणाची सुमारे 77 जणांची यादी जिल्हा प्रशासनाला पाठवण्यात आली आहे. दरम्यान, प्राधिकरणाकडून सध्या परिसराचे विकास करण्याचे व गृहप्रकल्प उभारण्याचे काम जोरात सुरु आहे. त्यात जिल्हा प्रशासनाकडून त्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम लागल्यास त्याचा पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाच्या प्रशासकीय कामावर परिणाम होण्याची शक्‍यता वर्तवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)